अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला एक कलंक आहे

अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला एक कलंक आहे
ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वांना दिव्य संदेश देणारे,
 लाखो  घरांचा उद्धार करणारे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी तत्त्वज्ञ,
 समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुजीवक करणारे, ज्यांच्यामुळे  दिन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, 
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला.
दलित समाजातील अस्मिता जागृत करणारे पहिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 व्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील  आंबवडे या गावी झाला. "अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला एक कलंक आहे" भारतीय संस्कृतीचा पाया  घालणाऱ्या सर्व ऋषीमुनी महात्म्यांनी हे विधान केले आहे. पण तो कलंक घालविण्याचा प्रयत्न कुणी केला नाही; जर कोणी प्रयत्न केला असेल तर, ती व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
 विशाल भाल प्रदेश, तेजस्वी डोळे, उंच पुरा, सुदृढ बांधा, करारी वृत्ती, निग्रही स्वभाव असणारे  डॉ. बाबासाहेब‌‌ आंबेडकर  यांनी शिक्षणासाठी संघर्ष करून 18  - 18 तास अभ्यास करून  मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्या. फक्त पदव्या घेऊन ते थांबले नाहीत तर त्या शिक्षणाचा आणि त्यांना लाभलेली अफाट बुद्धिमत्तेचा उपयोग त्यांनी  अखंडितपणे  शेवटपर्यंत देशाचा विकासासाठी आणि दलित समाजाच्या उद्धारासाठी केला. खरच एवढा त्याग करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
जन्मोत्सव अथवा जयंती तसेच स्मृतिदिन साजरे होणे भारतालााही नवीन नाही. परंतु कोणतीही सत्ता हातात नसताना लोकांकडून सुरू झालेली डॉ. बाबा साहेबांची जयंतीची परंपरा आजही लोक सहभागामुळे वेगळी ठरते. हे तितकंच खरं आहे. बाबासाहेबांच्या जयंती संदर्भात एक बाब अजून मला आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, पूर्वी मोठ्या मोठ्या  व्यक्तींची जयंती  ही  शासकीय तारखेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर जयंती साजरी होत असे पण, डॉ.आंबेडकर एक अपवाद आहेत की, बाबासाहेब हयात असतानाच  त्यांची जयंती साजरी होण्यात प्रघात सुरू झाला होता. आणि ते वर्ष होते.1927 
 14 एप्रिल 1942 रोजी वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत सुवर्ण जयंती महोत्सव तब्बल नऊ दिवस चालू होता आणि त्या जयंती महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवव्या दिवशी सहभागी झाले होते. खरंच डॉ. बाबासाहेब हे कुण्या एका जातीचे वाटत नाहीत  तर ते प्रत्येकाला  आपले वाटतात. एवढं महान कार्य ते सर्वांसाठी करून गेले. म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्यांचा सार्थ  अभिमान आहे.आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल म्हणेन,
 'मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची
 तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची,
 तू देव नव्हतास,
 देवदूतही नव्हतास, 
तर खरा महामानव होतास" आणि म्हणूनच आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले सर्वांचे आदर्श आहेत हे कुणी नाकारू शकत नाही. त्यांचे जीवन व शिक्षण सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्य सर्वांसाठी  अतिशय महत्त्वाचे आणि  प्रेरणादायी ठरले आहे.
त्यांचा उपयोग आजही प्रत्येक व्यक्तीने करणे गरजेचे आहे. त्यांच्या अफाट आणि अफलातून बुद्धिमत्तेचे उदाहरण द्यायचे झाले तर, बॅरिस्टरची पदवी चार वर्षाची त्यांनी ती अवघ्या दोन वर्ष, दोन महिन्यात पूर्ण  केली. 24 तासांपैकी
 22 -  22 तास ते अभ्यास करत होते. आणि खरंच जर जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर, आपण देखील त्यांचा हा गुण अंगीकारणे गरजेचे आहे. कारण ती आता काळाची गरज आहे या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर, आपल्याला खूप अभ्यास करणे आणि सखोल माहिती मिळवणे गरजेचे आहे. 
"इरादे नेक है तो सपने साकार होते सच्ची लगन है तो, रास्ते आसान होते है " 
अगदी खरं आहे
जीवन एक कसोटी आहे 
मागे वळून पाहू नका. 
येईल  तारावयास कोणी 
वाट कोणाची पाहू नका. 
सारं जग जिंकायचा आहे
 हार कधी मानू नका. 
यश तुमच्याच जवळ आहे जिंकल्याशिवाय थांबू नका.
 ही गोष्ट कायम स्वरूपी लक्षात ठेवा. 
वामनराव पै म्हणतात,
 तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. स्वतः तुम्ही जेवढी मेहनत कराल त्याचं फळ तुम्हाला तेवढेच मिळणार आहे
हे पण कधी विसरू नका.
डॉ. बाबासाहेबांचे जीवन सर्वांसाठी खरंच  खूप प्रेरणादायी आणि आशावादी आहे. बिकट परिस्थितीत शिक्षणासाठी स्वतःची स्वप्न कशी साकार करावी? अन्यायाविरुद्ध लढताना पूर्ण ताकदीने कसे लढावे? किती समस्या व अडचणी असतील तरी त्यातून मार्ग कसा काढावा? किती मोठं वादळ आलं असेल तर त्या वादळासमोर उभा कसा राहायचं ?आणि आपलं जीवन आनंदमय सुखी्  करण्यासाठी कोणकोणत्या बिकट परिस्थितीला सामोरे जाऊन  जीवन जगावं कसं? हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर, अवघ्या संपूर्ण जगाला दाखवून दिले अशा महान व्यक्ती बद्दल मी  म्हणेन,
 हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा ही त्यांचा वेग जबरदस्त होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता 
असा रामजी बाबांचा लेख लेक भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता.
बाबासाहेबांनी दलित, वंचित, स्त्रिया, आदिवासी यांना दिलेला मूलमंत्र म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याची आठवण अनेकदा अनेकांनी दिली. परंतु शिक्षणाचे व्यापारीकरण होत असतानाच्या  आजच्या काळात शिक्षण संस्था उभारणे .संघटित होण्यासाठी दलित व दलितेतर नेतृत्वाला प्रश्न विचारणे आणि अशा संघटनातून वंचितांचे आजचे प्रश्न ओळखून त्यावर एकत्र येऊन संघर्ष करणे हाच खरा चळवळीचा मार्ग आहे.तो मार्ग कुठेतरी खुंटत असल्याचे चित्र सध्या आपल्याला दिसत आहे.  शिक्षणाचे बाजारीकरण व व्यापारीकरण हे कुठेतरी थांबलं पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून आपणास सांगावसे वाटते.
काय होते बाबासाहेब? हे आपणास पुढील ओळी मधून  सांगण्याचा छोटासा प्रयत्न करते.
दीन दलित गोरगरिबांची आई होतेे बाबासाहेब,
पिचलेल्या ठेचलेल्यांची दाई होते बाबासाहेब,
दाबलेल्या आवाजाचा हुंकार होते बाबासाहेब,
तार नसलेला विणेचा झंकार होते बाबासाहेब,
प्रयत्न, प्रयत्न ,प्रयत्न
 यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब,
अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाळ होते बाबासाहेब, दांभिकतेच्या कानाखालचा जाळ होते बाबासाहेब,
प्रयत्नशील करुणेचे बीज होते बाबासाहेब,
सुभेदार रामजी च्या कष्टाचे चीज होते बाबासाहेब,
बुद्ध, कबीर, फुलेंचा सार होते बाबासाहेब,
 लवलवते लेखणीचे धार होते बाबासाहेब,
निद्रिस्त लाव्हा पाहून खूप दुखी होते बाबासाहेब,
 संस्कृतीला दुसऱ्या देणारा ज्वालामुखी होते बाबासाहेब,
महाडच्या चवदार तळ्याची निळाई  होते बाबासाहेब,
 डोळ्यातल्या आभाळाची जळाई होते बाबासाहेब,
बुद्धांच्या करुणेचा सागर होते बाबासाहेब,
 शाहू महाराजांच्या लढ्याच्या आगर होते बाबासाहेब,
यारांचे यार आणि दुश्मनांची मित्र होते  बाबासाहेब,
 अजिंठा वेरूळच्या लेण्यातील कोरीव चित्र होते बाबासाहेब,
सवितेची कविता, लेकरांची रमाई होते बाबासाहेब,
 थकल्या भागल्या जीवासाठी प्रेमळ भिमाई होते बाबासाहेब.
भारतीय घटनेचे शिल्पकार,असामान्य व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम.

सौ रजनी राजेंद्र सोनवणे
         उपशिक्षिका
उल्हासनगर महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक 24

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार