पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका
पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका
पुणे : स्टेशनसमोरील एका इमारतीमधील जनरल स्टोअर्सला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) पहाटे घडली. या घटनेत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या इमारतीमधील दुकानालगतच्या वरच्या भागात असलेल्या लाॅजमधील प्रवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली.
पुणे स्टेशनसमोर विल्सन गार्डन परिसरातील लाॅजच्या इमारतीत अग्रवाल जनरल स्टोअर्स आहे. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळवली.
अग्निशामक दलाचे दोन बंब आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यानंतर अग्निशामक दलाचे दोन बंब आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्यासह जवानांनी पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणली.
जवानांनी शिडीच्या मदतीने या अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले
दरम्यान, याच इमारतीमधील लॉजमध्ये काही प्रवासी अडकले होते. जवानांनी शिडीच्या मदतीने या अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळाले. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद