कल्याणमध्ये व्हर्टेक्स गृहसंकुलाच्या पंधराव्या, सोळाव्या माळ्याला भीषण आग
कल्याण: येथील पश्चिमेतील आधारवाडी भागातील व्हर्टेक्स हाऊसिंग सोसायटीतील पंधराव्या माळ्यावरील सदनिकेला मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. आगीमुळे पंधराव्या, सोळाव्या माळ्यावरील काही सदनिका खाक झाल्या. लगतच्या चौदाव्या माळ्यावरील सदनिकांनाही आगीची झळ बसली. कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु, अतिशय उंचावर लागलेली आग, तेथपर्यंत उच्चदाबाने पाणी मारण्यात जवानांना अनेक अडथळे येत होते. मध्यमवर्गियांची वस्ती म्हणून व्हर्टेक्स गृहसंकुल ओळखले जाते. मंगळवारी संध्याकाळी या संकुलाच्या पंधराव्या माळ्यावरील सदनिकेला आग लागली. शहराबाहेर हे संकुल असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग भडकत गेली. पंधराव्या माळ्यावरील आग सोळाव्या माळ्यापर्यंत पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्याचे काम सुरू असताना काही घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. आग लागलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी उद्वाहन, जिन्याने जमिनीवर येणे पसंत केले. आग सोळाव्या माळ्या...