महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला आम्ही ,जाहीर आवाहन करतो की, जनहित लोकशाही पक्षाने ,2024 च्या,विधानसभेला महाराष्ट्रा तील अनेक मतदार संघांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत.
महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला आम्ही ,जाहीर आवाहन करतो की, जनहित लोकशाही पक्षाने ,2024 च्या,विधानसभेला महाराष्ट्रा तील अनेक मतदार संघांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत.
जनहित लोकशाही पक्ष,
मा अशोकराव आल्हाट संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष.
ओबीसी बहुजन आघाडी
मा , प्रकाश अण्णा शेंडगे राष्ट्रीय अध्यक्ष
बी. आर ,एस, पी, चे अध्यक्ष मा सुरेश माने
.लोकराज्य पक्ष मा, कोळी साहेब
मुस्लिम सेवा संघ,
मा मासुलकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष
आदि संघटना व संस्था,चे पुरस्कृत उमेदवार या निवडणूकीत उभे करण्यात आलेले आहेत.
आपण सुज्ञ मतदार आहात, 2024 च्या विधानसभेमध्ये जनहित लोकशाही पक्षाचे उमेदवार जाणे आवश्यक आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारधारेचा आहे का ,ही शंका उभी राहते .
या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक राजे होऊन गेले, गोरगरिबांचा, दिन दलितांचा बहुजनांचा, अठरा पगड जातीचा, वंचितांचा, ओबीसी ,बहुजनांचा, गोरगरिबांचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज ,यांच्या विचारधारेचा महाराष्ट्र सध्या आहे का ?तर नाही! आणि मग ,ज्या शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य, बारा बलुतेदार ,18 अलुतेदार आठरा ,पगड जातींच्या, जिवावर उभं केलं, उभं केलं, आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची विचार धारा,येथील प्रस्थापित पक्षांनी ,व नेत्यांनी,पायदळी तुडवून ,गोरगरीब जनतेला वेठीस धरलेले आहे, त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
या गोरगरीब जनतेला याच्यातून मुक्त करण्यासाठी,बाहेर काढण्यासाठी जनहित लोकशाही पार्टी व मित्रपक्षाची आरक्षणवादी आघाडी आगामी निवडणुकीत काम करणार आहे.
जनहित लोकशाही पार्टी पक्षाची स्थापना आम्ही याच साठी केलेली आहे.
महाराष्ट्राचे असंख्य प्रश्न सोडविण्यासाठी,
या उमेदवारांना आम्ही उभे केलेले आहे.
महाराष्ट्रातील अनेक प्रश्न जसेच्या तसे, आ वासून उभे आहेत, ते सोडवण्याचं काम, या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
आरक्षणवादी आघाडी, समविचारी लोकांना सोबतीला घेऊन, ही आघाडी आम्ही बनवलेली आहे.
ओबीसी बहुजन आघाडीचे संस्थापक माननीय प्रकाश अण्णा शेंडगे बीआरएसपी पक्षाचे आदरणीय नेते माननीय डॉक्टर ,एडवोकेट,मा .सुरेशजी माने, जनहित लोकशाही पक्षाचे माननीय अशोकराव आल्हाट साहेब,
मुस्लिम सेवा संघाचे,मा .मासुलकर लोकराज्य पक्षाचे, माननीय कोळी आदी संघटना प्रमुख आणि इतरही छोट्या-मोठ्या घटकांचे नेते या आघाडीमध्ये येऊन आरक्षणवादी आघाडी बनलेली आहे. ही आघाडी महाराष्ट्राच्या या ,विधानसभेच्या रणांगणामध्ये उतरून ,आरक्षणवाद्याचं मतदान आरक्षण वाद्यांनाच होणं गरजेचं आहे ,कारण संविधानिक लोकशाही आपण जर मानत असू ,तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची जी भूमिका, मांडली, आहे,त्या आरक्षणाला धोका पोहोचवण्याचं काम येथील अनेक ,सरकारांनी आतापर्यंत केलं आहे. गोरगरिबांना जनतेला दिलेलं आरक्षण ,यांना बंद करायचे आहे.
यांना जातीनिहाय जनगणना करायची नाही ,मध्यमवर्गीय गोरगरिबांना गरीब ठेवण्याचं काम यांना करायचे आहे.
अशा पद्धतशीरपणे यांनी स्वातंत्र्याच्या नंतर, ते आत्तापर्यंत केलेले आहे .
देशामध्ये कोणतंही सरकार असू द्या, यांनी आरक्षण संपवण्याचेच कटकारस्थान केलेले आहे .
आणि म्हणून आरक्षण वाचवायचे असेल, तर आरक्षणाचे संवर्धन करावे लागेल.हे ,करावयाचे असेल ,तर इथून पुढे तर येथून पुढे आपणास आरक्षणवादी आघाडीमध्ये येऊन, आरक्षण वाचवणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र ,अशा वळणावरती येऊन उभा आहे, की ,आता या सर्व प्रस्थापित पक्षांना घरचा रस्ता दाखवून, येथील समविचारी पक्षाचे सरकार बनवणं अत्यंत गरजेचे आहे. बेरोजगारीच्या प्रश्न अत्यंत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उभा झालेला आहे. नव्हे नव्हे,या लोकांनी बेरोजगार हा महाराष्ट्र बेरोजगार,कसा राहील, यावरच जास्त भर दिलेला आहे, महागाईचा आगडोंब ,महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे ,कोणत्याही शेतकरी मालाला योग्य बाजार भाव मिळत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न ,ऐरणी वर आलेले आहेत ,उद्योगधंदे देशोधडीला लागलेले आहेत ,असे एक ना, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांच्या, गरजेचे प्रश्न उभे राहिलेले आहेत ,त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तुमच्यामधीलच समजूतदार
सुशिक्षित असणारे, महाराष्ट्राच्या, सर्व विषयांची ,जाण असणारे सुशिक्षित उमेदवार, आम्ही आपल्या सेवेसाठी दिलेले आहेत.
महाराष्ट्रातील जनतेमध्ये महायुती ,आघाडी आणि महाविकास आघाडी, या दोन्ही आघाड्यांच्या लोकांवरती प्रचंड नाराजी आहे ,हे आपण पाहतच आहात,या आघाड्या मध्ये असणारे प्रस्थापित पक्ष ,व लोक आपल्याच, नातेवाईकांना राजकारणामध्ये पुढे आणण्याचं काम करताना आपण पाहत आहोत. प्रस्थापित राजकारण्यांनी आपल्या मुलाला आपल्या मुलीला आपल्या भावाला आपल्या पुतण्याला आपल्याच जवळील नातेवाईकांना राजकारणामध्ये उतरून अनेक पिढ्यांचे भलं होईल अशीच राजकीय व्यवस्था यांनी यांच्यासाठी केलेली आहे. आणि ही घराणेशाही मोडीत काढण्याचं काम, जनहित लोकशाही पार्टी ,आणि त्यांच्या आघाडीमध्ये असणाऱ्या समविचारी पक्षाने करण्याचे ठरवले आहे.
प्रस्थापित राजकीय पक्षांना व प्रस्थापित लोकांना कोणत्याही प्रकारचा या स्वातंत्र्यानंतर अधिकार राहिलेला नाही .
तरीही,त्यांनी त्यांचं उखळ पांढरं करून घेतलं ,100 पिढ्यांची व्यवस्था होईल ,असं एकमेकांच्या साह्याने, यांनी यांचं आर्थिक बाजू बळकट केली. येथील सर्वसामान्य जनतेच्या कोणत्याही प्रश्नाची कामे कोणतेही प्रश्न, यांनी सोडविले नाहीत, नवे यांना सोडवायचे नाहीत, यांना येथील ओबीसी, आदिवासी विमुक्त भटके, दलित ,मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, आदि जाती, समूहांना, हमेशा उपेक्षित ठेवायचं आहे ,आणि या घटकांचं कल्याण व्हावं यांचं भलं व्हावं असं यांना कधीही वाटत नाही, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून या लोकांना तोडा फोडीच राजकारण करून, जाती-जातीमध्ये भांडण लावून, यांची पोळी भाजण्याचे काम यांना करायचे आहे ,आणि म्हणून,या लोकांना थांबवण्याच्यासाठी ,आपण सर्वांनी या 2024 च्या विधानसभेला आपापल्या मतदारसंघांमध्ये ,आरक्षणवादी आघाडीचे असणारे उमेदवार, आणि जिथे आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार नसतील, अशा मतदारसंघांमध्ये चांगला पर्यायी उमेदवार शोधून, त्या उमेदवाराला सुद्धा महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांनी निवडून अनणे आवश्यक आहे.
प्रस्थापित पक्षांना आणि या प्रस्थापित राजकीय पुढार्यांना, आपल्याला घरी बसवल्याशिवाय, आता महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला पर्याय दिसत नाही याच्याशिवाय पर्याय नाही .आणि म्हणून
आरक्षण वादी आघाडीमध्ये या महाराष्ट्रातील असणारा ओबीसी, विमुक्त भटके ,अल्पसंख्यांक अनुसूचित जातीच्या असणाऱ्या सर्व जाती ,आदी सर्व घटक यामध्ये आपलं योगदान देत आहेत, प्रस्थापित पक्षांना व प्रस्थापित लोकांना रोखण्याचं काम ,आरक्षणवादी आघाडी करत आहे, आणि म्हणून महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार बंधूंनी आणि भगिनींनी या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून, या सर्व प्रस्थापित ,लोकांना रोखण्यासाठी,
या आरक्षण वादी आघाडी च्या,शिलेदारांना विधानसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे .आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला, आपल्या ,आरक्षणवादी आघाडीचा उमेदवाराना भरघोस मताने निवडून देणं, ही जबाबदारी आपली आहे ,या जबाबदारीचे भान आपणास असणं आवश्यक आहे, आणि ते तुम्ही कराल,यात तीळ मात्र शंका नाही.
प्रत्येक विधानसभेमध्ये असणारा चांगला उमेदवार ज्याची या सगळ्या विषयावरती व्यवस्थित मांडणी करण्याची जबाबदारी आहे ,अशा चांगल्या उमेदवारांना आपण निवडून देणे आवश्यक आहे. असे आवाहन
संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष जनहित लोकशाही पार्टी अशोकराव आल्हाट यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद