अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेने गांभीर्य दाखवणे गरजेचे
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेने गांभीर्य दाखवणे गरजेचे
प्रभाग समिती क्रमांक - ३ च्या अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर कँम्प नंबर ४ मधील व्हीनस चौक ते लालचक्की चौक या रस्त्यावर असलेल्या क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक परिसरात महिन्याच्या दर अमावस्या आणि पौर्णिमेला चौकाच्या आसपास काही समाजकंटक उतारा,लिंबू,नारळ,काळ्या जादुचे साहित्य मध्यरात्रीच्या वेळी गुपचूप टाकण्याचा खोडसाळपणा करित असतासफाई कामगार याकडे अंधश्रद्धेच्या माध्यमातून बघत असल्याने त्यांच्याकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात येऊन याठिकाणी दैनंदिन साफसफाई करण्याचे टाळले जात असल्याने हे सर्व साहित्य कित्येक दिवस चौकात तसेच पडलेले दिसते.क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समितीच्या वतीने दिनेश सोनावळे आणि सहकारी आठवड्यातून एकदा दर रविवारी चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात येते त्यावेळी हे सर्व साहित्य उचलले जात
महाराष्ट्र शासनाच्या काळा जादू अधिनियम २०१३ कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.ही बाब गंभीर स्वरुपाची आहे.अंधश्रद्धेतून कुणाचे शोषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये "महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३",हा कायदा पारीत केला.
हा एक गुन्हेगारी कायदा आहे.हा कायदा जादूटोणा, नरबळी, आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांचे अंधश्रद्धेतून शोषण होऊ शकेल ते कृत्य गुन्हेगारी अपराध ठरवितो.अशाप्रकारचा कायदा करणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे.मात्र,उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही.याबाबत उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे
अशी माहिती मनोज कोरडे पत्रकार/सामाजिक कार्यकर्ता
अध्यक्ष हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समिती, उल्हासनगर - ४ यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद