वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगर - ४ मध्ये सुभाष टेकडी येथे सारंग थोरात यांनी प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस केला साजरा तसेच वाढदिवसा निमित्ताने सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आल्या वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी बोलताना सांगितले सारंग थोरात साहेब यांचे सामाजिक कार्य महान आहे असे चव्हाण वाढदिवसानिमित्त मागदर्शन करीत होते तसेच वंचितचे सारंग थोरात यांना पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या असून या कार्यक्रमात वंचित चे शेषराव वाघमारे, रेखाताई उबाळे, उज्वल महाले , दिवाकर खळे, देवानंद ( प्रकाश) शिरसाट, महेंद्र अहिरे,प्रा सुरेश सोनवणे सर, प्रकाश इंगळे, प्रशांत सोनवणे, नितिन भालेराव, निलेश देवडे, दिपक आढाव, भारत थोरात, यांच्यासह भारतीय बौध्द महासभेचे रोशन पगारे, संदीप उबाळे, कल्पना वानखेडे, यावेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद