पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक

इमेज
सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक मुंबई :केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १० ठिकाणी छापे टाकले. त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली.                                सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तपासादरम्यान कल्याण येथील एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. तो कल्याण येथील रहिवासी आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत तो सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्याची चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बेकायदा सिमकार्ड व बनावट कागदपत्...

महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक

इमेज
महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक.    सोलापूर : गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलिस अटक करतील म्हणून घाबरून जातात. पण, गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे.त्या आरोपीला अटकेची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते. पोलिसांनी हा आदेश पाळला नाही, तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भारतीय न्याय संहितेनुसार अलीकडे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या अनेक गुन्ह्यांत संशयित आरोपींना शक्यतो अटक केली जात नाही. संबंधितांना नोटीस बजावून पोलिस चौकशीला बोलावतात, त्यानंतरही गरज वाटली तर त्या आरोपीस अटक करून पुढील तपास पोलिस करू शकतात.  दुसरीकडे, ६० वर्षांवरील आरोपीस अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यास पूर्वीचा गंभीर आजार असेल तर पोलिस शक्यतो अटक करत नाहीत. खास करून गुन्ह्यातील मुद्देमा...

सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद

इमेज
सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद  नंदुरबार महाराष्ट्र:सावकारी नियमनाचा कठोर कायदा असला तरी आजही गरजू सर्वसामान्य, शेतकऱ्यांना परवानाधारक किंवा विनापरवाना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. याचे कारण बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते.                             तातडीच्या गरजा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पैसा सुलभपणे मिळत नाही. तसेच कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकांकडून नवीन कर्जासाठी नकार देण्यात येतो. त्यामुळे सावकार हा एकमेव पर्याय उरतो. अनेकदा शेतकऱ्यांना बँकांच्या विविध कर्ज योजनांची माहितीच नसते. या कारणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा सावकारांच्या जाळ्यात अडकावे लागते. ज्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. कायद्याने दंडाची तरतूद कर्जदाराची कोणतीही स्थावर मालमत्ता कर्जापोटी स्वतःच्या नावावर करून घेता येत नाही. कर्ज वसुलीसाठी दमदाटी, मारहाण करता येत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कर्जदारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा निबंधक व इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांची ने...

कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

इमेज
*कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक**  कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक वेगवेगळ्या मार्गांनी केली जाते. फसवणूक करणारे लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात. फसवणुकीचे काही सामान्य प्रकार आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत:  *आमिष:*   स्कॅमर्स कमी व्याजदरात, कमी कागदपत्रांमध्ये किंवा कोणत्याही क्रेडिट तपासणीशिवाय त्वरित कर्ज मंजूर करण्याची हमी देतात.  कर्ज मंजूर झाल्याचे किंवा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून, कर्ज वितरीत करण्यापूर्वी "प्रोसेसिंग फी म्हणून काही रक्कम त्वरित भरण्यास सांगतात. हे पैसे भरल्यानंतर, ते एकतर गायब होतात किंवा आणखी काही भूल थापा देतात आणि कर्ज कधीच देत नाहीत.  *लक्षात ठेवा:*   कोणतीही प्रतिष्ठित बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी अशी मोठी रक्कम थेट तुमच्याकडून खात्यात जमा करून घेत नाही.  *सामान्यतः*  प्रोसेसिंग फी किंवा इतर फी कर्जाच्या रकमेतून वजा केली जाते. फसवणूक करणारे कर्जाची रक्कम मंजूर झाल्याची खोटे धनादेश किंवा ...

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

इमेज
डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन                             ब्राह्मणी येथील दोन दिवसीय शिबिरात 2 नोव्हेंबर 2025 व 3 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या ज्येष्ठ नागरिक सहाय्यक साधने मोफत वाटप शिबिरात  721 ज्येष्ठ नागरिक लाभार्थी तपासणी होऊन पात्र झालेले आहेत या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या एकूण सहाय्यक साधनांची किंमत 67 लाख 13 हजार 238 रुपये इतकी आहे सर्व लाभार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.   या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुजय दादा विखे पाटील व सन्माननीय अक्षय दादा कर्डिले, यांच्या उपस्थितीत लवकरच या सहायक साधनांचा प्रत्यक्ष वाटप समारंभ आयोजित केला जाईल.    याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण नाना बानकर, जिल्हा परिषद माजी सदस्य विक्रम राव तांबे, सरपंच सौ सुवर्णाताई बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, विजय वानकर, भाजपा तालुका...