कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

*कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक** 
कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक वेगवेगळ्या मार्गांनी केली जाते. फसवणूक करणारे लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात.

फसवणुकीचे काही सामान्य प्रकार आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

 *आमिष:* 
 स्कॅमर्स कमी व्याजदरात, कमी कागदपत्रांमध्ये किंवा कोणत्याही क्रेडिट तपासणीशिवाय त्वरित कर्ज मंजूर करण्याची हमी देतात.

 कर्ज मंजूर झाल्याचे किंवा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून, कर्ज वितरीत करण्यापूर्वी "प्रोसेसिंग फी म्हणून काही रक्कम त्वरित भरण्यास सांगतात.

हे पैसे भरल्यानंतर, ते एकतर गायब होतात किंवा आणखी काही भूल थापा देतात आणि कर्ज कधीच देत नाहीत.

 *लक्षात ठेवा:* 
 कोणतीही प्रतिष्ठित बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी अशी मोठी रक्कम थेट तुमच्याकडून खात्यात जमा करून घेत नाही.

 *सामान्यतः* 
प्रोसेसिंग फी किंवा इतर फी कर्जाच्या रकमेतून वजा केली जाते.

फसवणूक करणारे कर्जाची रक्कम मंजूर झाल्याची खोटे धनादेश किंवा कॅश रक्कमेचे फोटो किंवा पावत्या दाखवून फसवणूक करतात

 *आमिष:* 
 तुम्हाला अचानक फोन कॉल, ईमेल किंवा मेसेज येतात, ज्यात तुम्ही कर्जासाठी पात्र असल्याचे सांगितले जाते.
 
 फसवणूक करणारे तुम्हाला लगेच निर्णय घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी माहिती देतात आणि 'कोणत्याही कागदपत्रांशिवाय' कर्ज मिळेल, असा दावा करतात, ज्यामुळे तुम्ही फसवणुकीवर विश्वास ठेवता.

 *ओळख:* 
जर एखाद्या संस्थेचा पत्ता किंवा परवाना तपशील स्पष्ट नसेल, तर ते संशयास्पद असू शकते.

फसवणूक करणारे विश्वास संपादन करण्यासाठी बनावट कर्ज मंजुरी पत्रे खोट्या एफडी पावत्या किंवा धनादेश *(Cheques)* दाखवतात.
ते स्वतःला प्रतिष्ठित बँक/कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात.
 फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही
 
 *तपासणी करा:* 
जर तुमची फसवणूक झाली असेल, तर त्वरित सायबर सेल *(Cyber Cell) किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा.                    

                 *जनहित के लिए जारी**

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा