आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक

आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक

(अंबरनाथ वृत्त)
मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही नगरपालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. या नगरपरिषदेची निवडणूक वीस दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे.नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान आता थेट 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.

 तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आलं आहे. कोणत्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली?

अंबरनाथ नगरपरिषेदतील प्रभाग क्रमांक 5 ब आणि प्रभाग 15 ब, प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग 19 अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्यावी लागणार आहे. 

नगरपरिषद निवडणूक आता वीस दिवस लांबणीवर गेली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का बसला आहे. काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाराच्या निकालाविरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे न्यायालयाने या प्रभागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

निवडणूक पुढे ढकलण्याची प्रमुख 4 कारणे

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही निवडणूक पुढे ढकलण्याची प्रमुख 4 कारणे आहेत. काही उमेदवारांनी अर्जांच्या छाननीबाबत उच्च न्यायालयात अपील केलं होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खालील बाबींचे पालन न करता उमेदवारांना अर्ज माघारीसाठी वेळ न देताच थेट चिन्ह वाटप केलं, 

ज्यामुळे न्यायालयाने निवडणूक नव्याने घेण्याचे निर्देश दिले:

1) अपिलाचा निकाल उशिरा लागणे.
2) लेखी निकाल प्राप्त न होणे.
3) काही प्रकरणांमध्ये अपिलांची सुनावणी झाली नसताना प्रक्रिया पुढे नेणे.
4) काही प्रकरणे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असतानाही घाईने चिन्ह वाटप करणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा