एका रात्रीत गायब झाले संपूर्ण गाव ? न सुटलेले रहस्य ?
*एका रात्रीत गायब झालेले संपूर्ण गाव: 'कुलधरा'चे न सुटलेले रहस्य* इतिहासामध्ये अनेक अशी रहस्ये दडलेली आहेत, ज्यांची उत्तरे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानालाही आजपर्यंत शोधता आलेली नाहीत. असंच एक अंगावर काटा आणणारं आणि विचार करायला लावणारं रहस्य राजस्थानच्या वाळवंटात दडलं आहे. एकाच रात्रीत तब्बल १५०० लोक राहते घरदार सोडून अचानक गायब होतात आणि जाताना त्या जागेला एक असा शाप देतात की, त्यानंतर पुढील २०० वर्षे तिथे पाखर देखील फिरत नाही! हे काल्पनिक चित्रपट किंवा कादंबरीचे कथानक नसून, राजस्थानमधील कुलधरा'या गावाचे जळजळीत सत्य आहे. राजस्थानमधील ऐतिहासिक जैसलमेर शहरापासून साधारण १८ किलोमीटर अंतरावर असलेले 'कुलधरा' हे गाव १३ व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी वसवले होते. हे ब्राह्मण अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू आणि जलव्यवस्थापनात पटाईत होते. वाळवंटी भागातही त्यांनी शेती फुलवली होती. उत्कृष्ट वास्तुकलेची साक्ष देणारी दुमजली पक्की घरे, विहिरी आणि मंदिरांनी हे गाव नटलेले होते. कुलधरा आणि आसपासची अशी ८४ गावे पालीवाल ब्राह्मणांच्या समृद्धीने ओसंडून वाहत होती. साधारण १८२५ च्या सुमारास ...