उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू .

उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू .
उल्हासनगर  कॅम्प नंबर 5, मधील  कपलेश्वर महादेव मंदिर जवळ ओटी सेक्शन मध्ये मानस टॉवर सोसायटी चा स्लैब कोसळला असून या दुर्घटनेमध्ये चार जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी पोहोचले व स्लॅबच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या . सागर ओचानी वय वर्ष 19, रेणू ढोलनदास धनवाणी वय वर्ष 55,  ढोलनदास धनवाणी वय वर्ष 58, प्रिया धनवाणी वय वर्ष 24, यांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे, घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस अधिकारी व कर्मचारी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून पुढील कार्य सुरू आहे, ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप