उल्हासनगर मनपा आयुक्त अजिज शेख यांची आयएएस पदी निवड

उल्हासनगर मनपा आयुक्त अजिज शेख यांची आयएएस पदी निवड 
उल्हासनगर: ( मुख्य संपादक हरी आल्हाट )
शहरात विविध उपक्रम राबविणारे महापालिका आयुक्त अजिज शेख येणाऱ्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते
सेवानिवृत्तीपूर्वी त्यांची आयएएस पदी पदोन्नती झाल्याची चांगली बातमी मिळाली आहे
आयुक्त अजिज शेख यांना दोन वर्षे शासन सेवा मिळणार असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय साधून महापालिकेतील कामाची पद्धत बदलून टाकली तसेच कर्मचारी व अधिकारी यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने बजावले त्यांचे कौतुक सुद्धा केले आणि ज्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये बे जबाबदार पण दाखवला त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली 
त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक महत्त्वाची कामे पार पडली यापैकी उल्हासनगर शहरात सिंधू भवन, महापालिका रुग्णालय, तसेच उल्हास घाट उभा राहिला आहे

एम एम आर डी ए अंतर्गत 150 व 99 कोटीच्या निधीतून रस्ते व इतर विकास कामे 426 कोटींची भुयारी गटार योजना 123 कोटींची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून

शहरातील कचरा उचलण्यासाठी अद्यावत गाड्या अग्निशमन विभागात नवनवीन पद्धतीच्या गाड्या दाखल झाल्या आहेत

आयुक्त अजिज शेख यांनी महापालिका मधील कारभार यशस्वीपणे व जबाबदारीने कर्तव्यदक्षपणे पार पाडला आहे

अजीज शेख यांची आयएएस पदी निवड झाल्यावर अजिज शेख यांना दोन वर्ष शासन सेवा मिळणार आहे 
परंतु आय ए एस पदी निवड झाल्यानंतर अजिज शेख यांना इतर ठिकाणी बढती मिळते की ?
महापालिकेतच आपला कार्यकाल पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

अजिज शेख यांना पुढील दोन वर्षाची सेवा महापालिकेतच मिळाली तर उल्हासनगर महानगरपालिका चे सफाई कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या ज्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यापैकी प्रथम  सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची मागणी उल्हासनगर महानगरपालिका सफाई कर्मचारी राहत असलेल्या वाल्मिकी नगर कॅम्प नंबर पाच मधील इमारतीमधील घरे सफाई कामगारांना मालकी हक्काचे मिळावे तसेच सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक यांना सातवा वेतन आयोगाची थकीत रक्कम लवकरात लवकर एक रक्कमी  मिळावी अशा प्रलंबित मागण्या त्याही पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार