राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 ने बबन सहदेवराव नागले सर सन्मानित
राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 ने बबन सहदेवराव नागले सर सन्मानित
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होणारे मासिक, शिक्षण संवेदन मासिक (अनुराग प्रकाशन) वतीने १५ वा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी अचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन, भारतीय संविधान पूजन व शिवजयघोषाने प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली.
शिक्षक बबन सहदेवराव नागले हे मूळ खडका, वरुड जिल्हा: अमरावती गावचे रहिवाशी असून नॅशनल हायस्कूल, उल्हासनगर येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण सेवा २७ वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती जिल्हा शाखा ठाणे, चे सचिव व नाशिक विभागाचे अध्यक्ष आहेत, समाज प्रबोधन ग्रंथालय चे अध्यक्ष, बोधिवृक्षशिक्षण संस्था अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते.आर. एस. पी. अधिकारी, उल्हासनगर
अशा विविध पदांवर काम करत आहेत. बबन सहदेवराव नागले करत असलेले उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य व महापुरुषांचे विचार, कार्य विद्यार्थ्यापर्यंत व समाजापर्यंत पोहचवून प्रबोधन करून समतावादी समाज घडवण्याचे बहुमोल कार्य करीत आहेत. अशा अनमोल कार्याबद्दल त्यांना शिक्षण संवेदन मासिक (अनुराग
प्रकाशन) तर्फे राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ सन्मानिय संपादक डॉ. माधव गवई व डॉ. केशर जाधव यांचे हस्ते शाल, पुष्पगुच्छ आकर्षक सन्मान चिन्ह व पुस्तके व शिक्षण संवेदन मासिक संच देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. सुभाष खंदारे, अधिकारी विजय सिंह नाईक, प्रा. डॉ. दिपक बाघ, प्रा. डॉ. अपर्णी प्रभू, डॉ. केशर
जाधव, अॅड. दिलिप वाळंज सर, व इतर मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रा. डॉ. माधव गवई संचालक, संपादक, शिक्षण संवेदन, प्रा. डॉ. कमल माधव गवई प्रकाशिका अनुराग प्रकाशन कल्याण यांनी केले.
या आनंद प्रसंगी शिक्षक बबन सहदेवराव नागले यांनी सांगितले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रथम छत्रपती शिवाजीमहाराज यांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली. अशा शिवजयंती दिनी मला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त होतो ही माझ्यासाठी खूप सन्मानपूर्वक बाब आहे. मी धन्य धन्य झालो आहे. शिक्षक बबन सहदेवराव नागले यांचा विविध सामाजिक स्तरातून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
------------------------------------------------
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद