श्री संत रोहिदास महाराज चौकाचे जयंती पूर्वी सुशोभिकरण मनसे चे वतीने उमपा आयुक्तांचे आभार

श्री संत रोहिदास महाराज चौक चौकाचे जयंती पूर्वी सुशोभिकरण मनसे चे वतीने उमपा आयुक्तांचे आभार 
उल्हासनगर कॅम्प 3 मधील  क्रिटिकेयर हॉस्पिटल समोर श्री.संत रोहिदास महाराज चौकाची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली होती.या बाबत मनसेच्या वतीने वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा सुरु होता 
5 फेब्रुवारीला श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती आहे व या जयंतीच्या अगोदर या चौकाचे सुशोभिकारण करण्यात यावे अशी मनसेची मागणी होती जर 5 फेब्रुवारी पर्यंत या चौकाचे सुशोभिकरण केले नाही तर जयंतीच्या दिवशी याच चौकात मनसेच्या वतीने लक्षणिक उपोषण करण्यात येणार होते परंतु मा.आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता प्रशांत सोळंकी,उपाभियंता संदीप जाधव यांनी 5 फेब्रुवारी पर्यंत जयंती पूर्वी या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वसन दिले होतेव ते प्रधान्याने पूर्ण केल्या बद्दल मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी मा.आयुक्त,शहर अभियंता व उपाभियंता यांचे आभार मानले.या साठी जिल्हा सचिव संजय घुगे,उपशहर अध्यक्ष मुकेश सेठपलांनी,शैलेश पांडव,सचिन बेंडके,सुभाष हटकर,अनिल जाधव,उपविभाग अध्यक्ष विक्की जिप्सन,अनिल माखीजा,प्रकाश कारंडे यांनी ही यासाठी अथक प्रयत्न केले. अशी माहिती मनसे चे बंडू देशमुख यांनी दिलीबातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९०६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार