पोस्ट्स

ऐतिहासिक भूमिकेत मनवा नाईकशिवप्रताप गरुड़झेप चित्रपटात साकारणार सोयराबाईंची भूमिका

इमेज
ऐतिहासिक भूमिकेत मनवा नाईक शिवप्रताप गरुड़झेप चित्रपटात साकारणार सोयराबाईंची भूमिका अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईक हिने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा  अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ‘शिवप्रताप गरुड़झेप’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका ती यात साकारणार आहे. 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत  आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. ५ ऑक्टोबरला 'शिवप्रताप गरुडझेप' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर तेसुद्धा ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते, असं मनवा सांगते. अत्यंत रूपवान आणि लावण्यवती असणाऱ्या

अनुसूचित भटक्या विमुक्त आदिवासी जमाती संघटना यांच्या वतीने भटक्या विमुक्त समाजातील विविध जाती जमाती कार्यकर्त्यांची बैठक

इमेज
 अनुसूचित भटक्या विमुक्त आदिवासी जमाती संघटना अंबरनाथ यांच्या वतीने  अंबरनाथ येथे भटक्या विमुक्त समाजातील विविध जाती जमाती कार्यकर्त्यांची बैठक अंबरनाथ दि.19 (प्रतिनिधी ) अनुसूचित भटक्या विमुक्त आदिवासी जमाती संघटना अंबरनाथ यांच्या वतीने  अंबरनाथ येथे भटक्या विमुक्त समाजातील विविध जाती जमाती कार्यकर्त्यांची बैठक नवीन समाज भवन  शास्त्री नगर अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मंत्रालयातील माजी उपसचिव तथा अध्यक्ष भटके विमुक्त आदिवासी जमाती महासंघ अंबरनाथचे अध्यक्ष श्री कैलास भनडालकर होते. नुकतेच दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विमुक्त भटके जमाती यांचा अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गात समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणी सह इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. या बाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मनोहर बंदपट्टे (वडार समाज ) मारुती गायकवाड (कैकाडी समाज ) विनोद परमार (राजपूत भामटा समाज ) नित्यानंद गायकवाड (टकारी समाज ) हुसेन जाधव (कैकाडी समाज ) राकेश गारुंगे (कंजार भाट स

जळगाव येथील पोलीस निरीक्षक बकाले यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसंग्रामने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्यामार्फत दिले निवेदन

इमेज
जळगाव येथील पोलीस निरीक्षक बकाले यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसंग्रामने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्यामार्फत दिले निवेदन दि. १९ सप्टेंबर २०२२ जळगाव येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली व त्याचप्रमाणे मराठा समाजातील महिलांचा अपमान व्हावा अशी वक्तव्य केली त्यावरून मराठा समाजामध्ये अतिशय रोष आणि संताप निर्माण झाला होता त्याची दखल घेऊन बकाले यांना निलंबित करण्यात आले होते. सदरची कारवाई ही अपुरी असल्याने मराठा समाजात त्याबाबतही असंतोष होता. शिवसंग्राम, मुंबईतर्फे आज मुंबई जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असे निवेदन दिले की, पो. निरीक्षक बकाले यांच्या वरती निलंबनाची केलेली कारवाई ही पुरेशी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा व त्यांना अटक केली जावी.त्याचप्रमाणे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी आंबरे,मुख्य प्रवक्ते प्रफुल्ल पवार,मुंबई कार्याध्यक्ष विवेक

*उर्मिलासोबत काम करण्याचं श्रेयसचं स्वप्न होणार साकार*

इमेज
*उर्मिलासोबत काम करण्याचं श्रेयसचं स्वप्न होणार साकार* अवघ्या मनोरंजन विश्वाला आश्चर्याचा सुखद धक्का देत मराठी सिनेसृष्टीनं एकाच वेळी तब्बल सात चित्रपटांची घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजवर हिंदीमध्ये बऱ्याच सुपरहिट चित्रपटांचं लेखन आणि निर्मिती करणाऱ्या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी एकत्रितपणे आगामी सात चित्रपटांची घोषणा केली आहे. बुधवारी मुंबईत संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मराठीतील दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या साक्षीनं सात चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली. मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते असून, सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप ऑनलाइन निर्माते आहेत. या चित्रपटांच्या यादीतील 'ती मी नव्हेच' या महत्त्वपूर्ण चित्रपटानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परितोष पेंटर यांनी लिहिलेल्या 'ती मी नव्हेच' या चित्रपटात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत हे हिंदी कलाविश्वातील नामवंत कलाकार प्रथमच मराठीमध्ये

*बार्शीटाकळी येथे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बार्शीटाकळी ग्रामीण व शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

इमेज
*बार्शीटाकळी येथे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बार्शीटाकळी ग्रामीण व शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न* बार्शी टाकळी येथे भाजप कार्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.ना. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, माननीय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला यांचे मार्गदर्शनात व माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये युवा मोर्चा बार्शीटाकळी शहर व ग्रामीण तर्फे  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी बार्शीटाकळी येथे करण्यात आले. यावेळी माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे, राजु पाटील काकड भाजपा तालुकाध्यक्ष, योगेश कोंदनकार भाजयुमो तालुकाध्यक्ष, राम पाटील, संजय इंगळे, गणेश महल्ले, गणेश झलके, सुनील ठाकरे, सुधाकर महल्ले, अशोक राठोड, अवीनाश महल्ले, गोपाल महल्ले, श्रीराम येळवंकर, दत्ता साबळे, गोपाल वाटमारे, संगीत जाधव, पिंटु काकड, विजय खिरडकर, गोवर्धन सोनटक्के, विजय म