जळगाव येथील पोलीस निरीक्षक बकाले यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसंग्रामने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्यामार्फत दिले निवेदन

जळगाव येथील पोलीस निरीक्षक बकाले यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसंग्रामने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्यामार्फत दिले निवेदन

दि. १९ सप्टेंबर २०२२
जळगाव येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली व त्याचप्रमाणे मराठा समाजातील महिलांचा अपमान व्हावा अशी वक्तव्य केली त्यावरून मराठा समाजामध्ये अतिशय रोष आणि संताप निर्माण झाला होता त्याची दखल घेऊन बकाले यांना निलंबित करण्यात आले होते. सदरची कारवाई ही अपुरी असल्याने मराठा समाजात त्याबाबतही असंतोष होता. शिवसंग्राम, मुंबईतर्फे आज मुंबई जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असे निवेदन दिले की, पो. निरीक्षक बकाले यांच्या वरती निलंबनाची केलेली कारवाई ही पुरेशी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा व त्यांना अटक केली जावी.त्याचप्रमाणे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी आंबरे,मुख्य प्रवक्ते प्रफुल्ल पवार,मुंबई कार्याध्यक्ष विवेक सावंत,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष दीपक कदम,मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष कदम,मुंबई सरचिटणीस शशिकांत शिरसेकर,दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष पुंडलिक मालुसरे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष योगेश विचारे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष विजय राणे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विलास भोईटे, तालुकाध्यक्ष राम भोईटे व धनु मंगेला, त्याचप्रमाणे स्व.विनायकराव मेटे साहेब यांचे भाचे आकाश जाधव(युवानेते),जगदीश मेहेर,अनिल भेलसेकर इत्यादी उपस्थित होते.    
प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप