अनुसूचित भटक्या विमुक्त आदिवासी जमाती संघटना यांच्या वतीने भटक्या विमुक्त समाजातील विविध जाती जमाती कार्यकर्त्यांची बैठक

 अनुसूचित भटक्या विमुक्त आदिवासी जमाती संघटना अंबरनाथ यांच्या वतीने  अंबरनाथ येथे भटक्या विमुक्त समाजातील विविध जाती जमाती कार्यकर्त्यांची बैठक

अंबरनाथ दि.19 (प्रतिनिधी )
अनुसूचित भटक्या विमुक्त आदिवासी जमाती संघटना अंबरनाथ यांच्या वतीने  अंबरनाथ येथे भटक्या विमुक्त समाजातील विविध जाती जमाती कार्यकर्त्यांची बैठक नवीन समाज भवन  शास्त्री नगर अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मंत्रालयातील माजी उपसचिव तथा अध्यक्ष भटके विमुक्त आदिवासी जमाती महासंघ अंबरनाथचे अध्यक्ष श्री कैलास भनडालकर होते.

नुकतेच दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विमुक्त भटके जमाती यांचा अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गात समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणी सह इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. या बाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मनोहर बंदपट्टे (वडार समाज ) मारुती गायकवाड (कैकाडी समाज ) विनोद परमार (राजपूत भामटा समाज ) नित्यानंद गायकवाड (टकारी समाज ) हुसेन जाधव (कैकाडी समाज ) राकेश गारुंगे (कंजार भाट समाज ) सुंदर डांगे (बंजारा समाज ) रमेश जाधव (टकारी समाज ) सर्वश्री संग्राम बंदपट्टे, कसाळकर, धोत्रे (वडार समाज ) बाबू गायकवाड (कैकाडी समाज ) प्रकाश जाधव (टकारी समाज ) तसेच शासकीय कामगार चळवळीतील प्रतिनिधी श्री तायडे आणि बौध्द समाजाचे राहुल हंडोरे यांनी मार्गदर्शन केले.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
बातमीआणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार