उल्हासनगर महापालिकेच्या उल्हासनगर - ५ मधिल अनाधिकृत कचरा डेपो तात्काळ बंद करा - मनसे
उल्हासनगर महापालिकेच्या उल्हासनगर - ५ मधिल अनाधिकृत कचरा डेपो तात्काळ बंद करा - मनसे उल्हासनगर महापालिकेच्या उल्हासनगर 1 मधील राणा खदान या कचरा डेपोची क्षमता संपण्या आधिच उल्हासनगर महापालिकेने कचरा डेपोसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करने आवश्यक होते.परंतु तत्कालीन सत्ताधारी व प्रशासन यांच्या नाकर्तेपणा मुळे कचराडेपो साठीच्या पर्याय जागेची व्यवस्था होऊ शकली नाही.कारण महापालिके कडून कचराडेपो साठी एकही भुखंड राखीव ठेवला गेला नाही किंवा तशी तरतुदही सुद्धा केली गेली नाही.त्यामुळे कचरा डेपोच्या जागेसाठी महपालिकेला राज्य शासनावर अवलंबून रहावे लागत आहे.आणि शासनाने कचराडेपो साठी जी जागा दिली आहे तेथे कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. आशा वेळेला पर्यायी जागेची व्यवस्था करणे हे सुद्धा महापालिकेचे कर्तव्य होते.परंतु महापालिका या कचराडेपोच्या जागे बाबत गंभीर दिसत नाही असा आरोप शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे राणा खदान येथिल कचरा डेपोची क्षमता संपल्यामुळे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी फुलेनगर,गायकवाडपाडा,उल्हासनगर - ५ येथे नागरी वस्तीत असल