वास्तवाची दाहकता सांगणारा सिनेमा ‘हेल्लारो’ आशियायी चित्रपट महोत्सवात

वास्तवाची दाहकता सांगणारा सिनेमा ‘हेल्लारो’ आशियायी चित्रपट महोत्सवात 
यंदाच्या १९व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात ५ गुजराती चित्रपटांची स्क्रीनिंग

मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर
१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात दरवर्षी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील आणि भाषांमधील उत्तम दर्जाचे चित्रपट रसिकांना पाहण्यासाठी निवडले जातात. यंदाच्या ५ गुजराती चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. या मधे राष्ट्रीय पारितोषिक मिळालेली  अभिषेक शाह दिग्दर्शित 'हेल्लारो' चा समावेश आहे. तसेच 'धाड' (दिग्दर्शक - परेश नाईक), 'रेवा' (दिग्दर्शक - राहूल भोले व विनीत कनोजिया), २१ एम यु टिफीन (दिग्दर्शक - विजयगीरी बावा) या चित्रपटांचा  आणि 'आ छे मारू गाम' ( दिग्दर्शक - गोपी देसाई) या लघुपटाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे._हेल्लारो' हा सिनेमा स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक मागासलेपणाची गोष्ट सांगतो. ‘हेल्लारो’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘मोठी लाट’ असा होतो. १९७५ सालच्या कच्छ भागातील समरपुरा नावाच्या गावाची ही गोष्ट आहे. वाळवंटातल्या या छोट्या वस्तीतल्या स्त्रियांच्या आंतरिक घुसमटीमागचं कारण अर्थातच पुरुषसत्ताक मानसिकता आहे. या काळात देवी म्हणून स्त्रीची पूजा करणाऱ्या पुरुषांची तथाकथित मर्दानगी मात्र स्त्रियांवर अत्याचार करण्यात धन्यता मानणारी आहे.
या महोत्सवात विविध राज्यांतील आणि भाषांमधील चित्रपटांसोबतच पाच गुजराती चित्रपटांची निवड  करण्यात आलेली आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा.
अशी माहिती मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यांनी दिलीबातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप