पोस्ट्स

भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन

इमेज
भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन .             उल्हासनगर: भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व मेयर ऑर्गनाइज यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक मित्र मंडळ लालचक्की रोड उल्हासनगर कॅम्प नंबर चार या ठिकाणी कॅल्शियम चेकअप शिबिराचे आयोजन विनामूल्य करण्यात आले होते सदर कार्यक्रम पार पाडण्यात मंडळाचे अध्यक्ष गणेश बोयर, मनोज पाटील, मुख्य तपासी अधिकारी अँटी पायरसी सेल मुंबई अधिकारी जितू उर्फ रामजित गुप्ता , अनिल कट्यारे, चरण थोरात, गणेश शेट्टी, लता पगारे मॅडम, लीलाधर भावसार, नितीन सुतार, विकास गुजर, शांताराम बोरसे, यांनी पथक प्रयत्न केले, यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,

दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या;

इमेज
दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत. या नोटा अद्याप अवैध ठरवल्या नाहीत. नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा (२० हजार रुपये) जमा करता येणार आहेत. “बाजारात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असं कारण देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयच्या निर्णयाबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो काही विचाराअंतीच घेतला असेल.” प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काय मिळतं रे वाचून?

इमेज
'काय मिळतं रे वाचून?' 'काय मिळतं रे वाचून? किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?' ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील की ज्यामुळे मला पुस्तकांशिवाय राहणं जमतच नाही... म्हणजे 'मी का वाचतो ?' वगैरे तर.. वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की मी ज्यात इंटरेस्टेड आहे, म्हणून वाचतो. पुस्तकांशिवाय मला फार पोरकं पोरकं वाटतं, म्हणून वाचतो. मला सतत नवनवीन लेखक / लेखिकांच्या जबरदस्त प्रेमात पडायची खोड आहे म्हणून वाचतो. एखाद्या गोष्टीबद्दल मला फारच थोडं माहिती आहे, असं मला स्वत:लाच आतून वाटावं म्हणून वाचतो. चाकोरीबद्ध जगण्यातल्या कटकटींवर उतारा मिळावा म्हणून वाचतो. माझी कुणी सहज दिशाभूल करू नये म्हणून वाचतो. मी कधी दंगलखोर होऊ नये म्हणून वाचतो. माझ्यात सदैव एक भावनिक ओल टिकून रहावी म्हणून वाचतो. माझ्यात कधीही निर्बुद्ध आक्रस्ताळेपणा येऊ नये म्हणून वाचतो. कधी स्वत:चं भान यावं म्हणून वाचतो. कधी काळाचं भान हरवावं म्हणूनही वाचतो. कधी स्वत:चा अपुरेपणा कळावा म्हणून वाचतो. कधी माझ्यापासूनच सुटका करून घेण्यासाठीही वा

स्वर्गीय प्रकाश अहुजा यांच्या स्मृतिदिनानिमित्त निवासशेड व उद्यानाचे उद्घाटन.

इमेज
स्वर्गीय प्रकाश अहुजा यांच्या  स्मृतिदिनानिमित्त निवासशेड व उद्यानाचे उद्घाटन.     उल्हासनगर कॅम्प नंबर 3 च्या  शासकीय  मध्यवर्ती रुग्णालय सेंट्रल हॉस्पिटल च्या प्रांगनात  आसपास च्या गांवातून रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी  स्व. प्रकाश गोविंदराम आहुजा यांच्या पुण्यस्मृति निमित्त निवासशेड व उद्यान चे उद्घाटन 19 मे 2023 रोजी करण्यात आले, उद्योगपति दिनेश आहुजा आणि शिवसेनेच्या श्रीमती वर्षा दिनेश आहुजा यांच्या वतीने  सेंट्रल रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉ. मनोहर विठ्ठलराव बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने या जनहितकारी कार्य संपन्न झाले  शिवसेना चे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे , भुल्लर महाराज, गायकवाड, अंकुश म्हस्के, बिट्टू भाई, तसेच स्थानीक शिवसेना नेते यांच्या उपस्थितीत या गार्डन आणि शेड चे उद्घाटन करण्यात आले

मातोश्री शालन आनंदा रणखांबे यांच्या हस्ते वाचनालयास पुस्तके भेट

इमेज
मातोश्री शालन आनंदा रणखांबे यांच्या हस्ते वाचनालयास पुस्तके भेट नवज्योत क्रिडा मंडळ वाचनालयास  मदतीचे आवाहन ( कल्याण प्रतिनिधी आशा रणखांबे )  कल्याण: नवज्योत क्रिडा मंडळ आनंदवाडी कल्याण पूर्व येथे सर्वांसाठी  नवज्योत क्रिडा मंडळ वाचनालय लवकरच सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मदतीचे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सुप्रसिद्ध साहित्यिक जीवनसंघर्षकार नवनाथ आनंदा रणखांबे यांनी मातृत्व दिनाचे औचित्य साधून मातोश्री शालन आनंदा रणखांबे यांच्या हस्ते मंडळ कार्यालयात जाऊन 65 पुस्तके मदत भेट म्हणून दिले आहेत.  पुस्तकांचा स्विकार मंडळाचे माजी उपाध्यक्ष  दिपक भाऊ मारवाड यांनी केले.  मंडळाचे अध्यक्ष सतिश जाधव यांनी जीवनसंघर्षकार व त्यांच्या मातोश्रींचे आभार मानले  आहे.          मंडळाचे अध्यक्ष सतिश जाधव , सरचिटणीस  महेंद्र कांबळे , खजिनदार सुनिल गांगुर्डे , महेश जाधव, अशोक दोडले  , राजेश कोलकूंडे  , नितीन धाकतोडे  , विजय डिगे ,विजय पवार,  समीर मालुसरे, योगेश मालुसरे, सुरेश सहाणी  , कार्तिक सहाणे , मंडळाचे माजी अध्यक्ष व सल्लागार  संजय  डिगे  व सुनिल आण्णा बर्वे