काय मिळतं रे वाचून?


'काय मिळतं रे वाचून?'


'काय मिळतं रे वाचून? किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील की
ज्यामुळे मला पुस्तकांशिवाय राहणं जमतच नाही...

म्हणजे 'मी का वाचतो ?' वगैरे

तर..
वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की मी ज्यात इंटरेस्टेड आहे, म्हणून वाचतो.

पुस्तकांशिवाय मला फार पोरकं पोरकं वाटतं, म्हणून वाचतो.

मला सतत नवनवीन लेखक / लेखिकांच्या जबरदस्त प्रेमात पडायची खोड आहे म्हणून वाचतो.

एखाद्या गोष्टीबद्दल मला फारच थोडं माहिती आहे, असं मला स्वत:लाच आतून वाटावं म्हणून वाचतो.

चाकोरीबद्ध जगण्यातल्या कटकटींवर उतारा मिळावा म्हणून वाचतो.

माझी कुणी सहज दिशाभूल करू नये म्हणून वाचतो.

मी कधी दंगलखोर होऊ नये म्हणून वाचतो.

माझ्यात सदैव एक भावनिक ओल टिकून रहावी म्हणून वाचतो.

माझ्यात कधीही निर्बुद्ध आक्रस्ताळेपणा येऊ नये म्हणून वाचतो.

कधी स्वत:चं भान यावं म्हणून वाचतो.

कधी काळाचं भान हरवावं म्हणूनही वाचतो.

कधी स्वत:चा अपुरेपणा कळावा म्हणून वाचतो.

कधी माझ्यापासूनच सुटका करून घेण्यासाठीही वाचतो.

खरं तर मी आतल्या आत वठत जाऊ नये म्हणून वाचतो.

आणि वाचता वाचता कधीतरी एखाद्या वाक्यानं जगणं लख्ख उजळून निघतं म्हणूनही वाचतो...!

तुमचं कसं असतं? तुम्ही का वाचता?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार