पोस्ट्स

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आयुक्त यांना महिलांनी केली अर्जाद्वारे विनंती

इमेज
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आयुक्त यांना महिलांनी केली अर्जाद्वारे विनंती उल्हासनगर कॅम्प नंबर तीन या ठिकाणी कांबळे चाळ परिसरात राहत असलेल्या नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील महिलांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना विनंती अर्ज करून लवकरच उल्हासनगर कॅम्प नंबर 3 चोपडा कोर्ट जवळील,शिवसेना शाखेच्या मागे कांबळे चाळ या ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी असा विनंती अर्ज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना मनपा नागरी सुविधा सीएफसी कार्यालयातून देण्यात आला तसेच पाणीपुरवठा चे मुख्याधिकारी परमेश्वर बुडगे यांना ही देण्यात आला मागील 3-4 महिन्या पासून कांबळे चाळ परिसरात राहतं असलेल्या सौ. सुमन शेंडगे व ज्योती पवार यांनी पाणी पुरवठाचे संबंधित अधिकारी यांना तोंडी तक्रार करून सुद्धा आजपर्यंत तक्रार दूर झाली नसल्याने अखेर मनपा आयुक्त यांना व पाणी पुरवठा अधिकारी बुडगे यांना विनंती अर्ज करून वस्तीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा असा विनंती अर्ज करण्यात आला  असता पाणी पुरवठा अधि

बरेच वरिष्ठ नागरिक "श्रीमंत" म्हणून मरतात, पण "श्रीमंत" म्हणून जगत नाहीत

इमेज
बरेच वरिष्ठ नागरिक "श्रीमंत" म्हणून मरतात, पण "श्रीमंत" म्हणून जगत नाहीत   स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी हि त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे.  पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलासाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा  बहुतेकानी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला.  ना हे वरिष्ठ लोकं कुठे लांब सहलीला गेलेत, ना कधी त्यांनी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केलेत.  ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर!  नाटक सिनेमा सुद्धा वर्षातून दोन तीन वेळा!  पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एखादा दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही.  शहरात रहात असेल तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.  परिणाम झाले काय ?  तर मुलांना ना आधुनिक शिक्षण दिले, जे शिक्षण दिले ते फक्त आणि फक्त नोकरीभिमुख शिक्षण आहे.   कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकविले नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोट

श्रद्धा कांबळी यांना सावित्री- फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार

इमेज
श्रद्धा कांबळी यांना सावित्री- फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार मुंबई : विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती श्रद्धा शैलेश कांबळी यांना शिक्षक भारतीतर्फे यंदाचा 'सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार ' देऊन गौरविण्यात आले. संवेदनशील शिक्षिका म्हणून विविधांगी शैक्षणिक काम करत असतानाच अभियान या सामाजिक संस्थेच्या उपक्रमातही त्यांचा तितकाच सक्रिय सहभाग आहे.  सुजाण, सक्षम आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खार एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या वेळी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कल्पना शेंडे, अमोल गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

गरजू विद्यार्थ्यांनाशाळेत साहित्य वाटप श्रद्धा सत्यवान पाटील, यांच्या "शब्द शब्द गुंफावे " या कविता संग्रहाचे प्रकाशन डाॅ अरूणजी म्हात्रे,यांच्या हस्ते प्रकाशन

इमेज
     गरजू विद्यार्थ्यांनाशाळेत साहित्य वाटप मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर दि.१३/ फेब्रू / २०२४  महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअर आयोजित गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप" करण्यात आले.सालाबाद प्रमाणे या संस्थेने "डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मिडोज ठाणे येथे पार पाडला. प्रमुख पाहुण्या मिनाक्षिताई शिंदे यांनी दिप प्रज्वलन केले . श्रद्धा सत्यवान पाटील, यांच्या "शब्द शब्द गुंफावे " या कविता संग्रहाचे प्रकाशन डाॅ अरूणजी म्हात्रे,यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रसंगी सौ.मिनाक्षीताई शिंदे माजी महापौर,प्रितेश साबळे,ज्येष्ठ कवी ,साहित्यिक,सुरेश मेहता शीघ्र कवी,ठाणे जिल्हा रोटरी गव्हर्नर,जगदिश म्हात्रे,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती लिलावती मॅम,सौ.सुरेखा राऊत,माळी.संजू मडके निवेदक,साहित्यिक व रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा  संपादक हर आल्हाट 9960504729

राहुल देव साकारणार काकर खान

इमेज
राहुल देव साकारणार काकर खान अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये  खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या  चित्रपटात  ‘काकर खान’ ही खलनायकी  व्यक्त्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणारा ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपविली होती.  लोकांवर जिझिया कर लावत  काकर खानने  जनतेस  वेठीस  धरले होते.  काकरखानच्या  अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी  महाराजांनी  रयतेची  सुटका केली होती.    आपल्या या भूमिकेविषयी बोलताना राहुल देव सांगतात की, ‘आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी  क्रूरकर्मा  ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयी पर्यंतचे बदल करावे लागतात. काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भा