श्रद्धा कांबळी यांना सावित्री- फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार

श्रद्धा कांबळी यांना सावित्री- फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार
मुंबई : विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती श्रद्धा शैलेश कांबळी यांना शिक्षक भारतीतर्फे यंदाचा 'सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार ' देऊन गौरविण्यात आले. संवेदनशील शिक्षिका म्हणून विविधांगी शैक्षणिक काम करत असतानाच अभियान या सामाजिक संस्थेच्या उपक्रमातही त्यांचा तितकाच सक्रिय सहभाग आहे.  सुजाण, सक्षम आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खार एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या वेळी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कल्पना शेंडे, अमोल गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल