पोस्ट्स

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.

इमेज
पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.   महाराष्ट्र: भारतीय हवामान विभागाने 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांत जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने स्पष्ट केले आहे. या भागांतील नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांना संपूर्ण तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका तर नद्यांच्या पाणीपातळीमुळे फ्लॅश फ्लड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवण्याचे आदेश. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तयार ठेवणे. जुन्या व धोकादायक इमारतींसाठी सुरक्षा उपाय. ...

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य

इमेज
विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर, 7 सप्टेंबर 2025 रोजी विश्व हिंदू परिषद, लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जनादरम्यान सेवा उपक्रमात सहभाग घेतला. त्यांनी घेसर, निळजे आणि गणेश विसर्जन घाटांवर स्थानिक नागरिक आणि इतर सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांसाठी सेवा कार्य केले. बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी सर्व भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, फुलं आणि सजावट साहित्य गोळा करण्यासाठी मोठ्या निळ्या डस्टबिन बॅगचा वापर केला आणि सर्वांना नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. या गणेशोत्सवादरम्यान, विश्व हिंदू परिषद, लोढा पालावा प्रखंडने "नद्या वाचवा" (Save Rivers) अभियानही चालवले, ज्यात लोकांना पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्तींचे विसर्जन नद्यांमध्ये न करण्याचे आवाहन करण्यात आले. बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी इतर सामाजिक कल्याणकारी संस्थांनाही सहकार्य केले. या उपक्रमादरम्यान बजरंगदल प्रचारक श्री विक्कीजी काळे,...

शेकडो भगिनींची माजी आमदार नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी

इमेज
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही जपली 'सामाजिक रक्षाबंधना' ची संवेदना शेकडो भगिनींची नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी 9 कल्याण : *प्रतिनिधी कल्याणी आगटे*   रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारा आपल्या संस्कृतीतील एक प्रमूख सण.आजच्या या पवित्र सणाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही आपली सामूहिक रक्षाबंधनाची संवेदना जपल्याचे दिसून आले.  पवार यांना राखी बांधण्यासाठी कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला भगिनींनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.  गेल्या कित्येक वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा सामाजिक आणि सामुदायिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला जात आहे. त्यामध्ये आता केवळ फरक इतकाच आहे की यापूर्वी तो मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन साजरा केला जायचा. आणि यंदा हा सोहळा पवार यांच्या निवासस्थानी साजरा झाला. मात्र त्यानंतरही त्याची व्याप्ती यत्किंचितही कमी झाली नाही. कल्य...

वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगर - ४ मध्ये सुभाष टेकडी येथे  सारंग थोरात यांनी प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस केला साजरा तसेच वाढदिवसा निमित्ताने सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आल्या  वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी बोलताना सांगितले सारंग थोरात साहेब यांचे सामाजिक कार्य महान आहे असे चव्हाण वाढदिवसानिमित्त मागदर्शन करीत होते तसेच वंचितचे सारंग थोरात यांना पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या असून या कार्यक्रमात  वंचित चे शेषराव वाघमारे,  रेखाताई उबाळे, उज्वल महाले , दिवाकर खळे, देवानंद ( प्रकाश) शिरसाट, महेंद्र अहिरे,प्रा सुरेश सोनवणे सर, प्रकाश इंगळे, प्रशांत सोनवणे, नितिन  भालेराव, निलेश  देवडे, दिपक आढाव, भारत थोरात, यांच्यासह भारतीय बौध्द महास...

प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित

इमेज
प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित.                        सोलापूर : पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील निशांत सावतचे (वय २०) घराशेजारील चुलत वहिनी किरण सावतसोबत (वय २३) प्रेमसंबंध जुळले. बारावीपर्यंत शिकलेला निशांत कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता.           २० दिवसांपूवी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनी 'सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे' असा तगडा प्लॅन आखला होता. निशांतने पंढरपूर हद्दीतून एक अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरून गावीही आणले होते. किरणच्या आई-वडिलांनी तिचा विवाह धुमधडाक्यात लावला होता. किरणला छोटी मुलगी आहे. पती तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा, पण निशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. काही महिन्यांनंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून गळा आवळला आणि तिचा मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजी...