पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. 
 महाराष्ट्र: भारतीय हवामान विभागाने 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांत जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने स्पष्ट केले आहे. या भागांतील नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांना संपूर्ण तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका तर नद्यांच्या पाणीपातळीमुळे फ्लॅश फ्लड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवण्याचे आदेश. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तयार ठेवणे.
जुन्या व धोकादायक इमारतींसाठी सुरक्षा उपाय.
वीजपुरवठा आणि रस्ते दुरुस्ती पथक तत्पर ठेवणे.
मध्यम धरणांचा साठा व विसर्ग नियमित तपासणे.

तसेच नागरिकांना सतर्क ठेवण्यासाठी आपत्तीपूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांतून प्रसारित करण्यात येणार आहेत.

नागरिकांसाठी सूचना :- अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.
धोकादायक व पूरप्रवण भाग टाळावेत.
वीज पडत असताना झाडाखाली उभे राहू नये.
नद्या-नाल्यांवरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
आपत्तीच्या वेळी स्थानिक निवारा केंद्रांचा वापर करावा.
अनावश्यक प्रवास व पर्यटन टाळावे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप