अंबरनाथ मधील मुस्लिम समाजाकरिता दफनभूमीसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टच्या वतीने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे करण्यात आली.

अंबरनाथ शहरात सुमारे ८० हजारहून अधिक मुस्लिम समाज बांधव वास्तव्यास आहेत. सद्या अस्तित्वात असलेल्या दफनभूमीची परिस्थिती पाहता मुस्लिम बांधवाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  यामुळे अंबरनाथ मधील मुस्लिम समाजाकरिता दफनभूमीसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी रविवारी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टच्या वतीने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे करण्यात आली. 
मुस्लिम बांधवांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पर्यंत आपली मागणी पोहचवतो असे सांगितले. 
याप्रसंगी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष श्री.सलीम चौधरी, जनरल सेक्रेटरी श्री.हबीब सौदागर, श्री. रफिक खान, श्री.माजिद नुरी, श्री. अस्लम खान आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका