जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप
उल्हासनगर: जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरात ३ डिसेंबर २०२५ रोजी 'दिव्यांग आधार सेवा संस्थे'च्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पालिका ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले, 

ज्यामुळे त्यांना महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दिव्यांग आधार सेवा संस्थेने गेली दीड वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या ओळखपत्र वाटपामुळे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना महापालिका परिवहन विभागाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.

 आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी महापालिकेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती आव्हाळे मॅडम यांच्यासह दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त साहेब, दिव्यांग कल्याणकारी विभागाचे वरिष्ठ लिपिक, वानखडे साहेब लिपिक, गौतम ससाने, अर्चनाताई आणि वाघमारेताई यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सोहम फाउंडेशनचे राजेंद्र देठे सर यांच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांना भेटवस्तूंचेही वाटप करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत, सचिव छाया सावंत आणि त्यांचे सहकारी इंदूताई जाधव, अर्चनाताई चव्हाण, जितेंद्र गायकवाड, गजानन तोरस्कर, चंद्रभान बागुल, तसेच शशीकुमार इंगळे यांचा मोलाचा सहभाग लाभला.
यावेळी 'जनहित न्यूज महाराष्ट्र'चे संपादक मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनीही सहकार्य केले. उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

(जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.