*मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेकलाकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...**कलाकारांचे प्रश्न शासनामार्फत सोडवण्याची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही...* दिनांक ३ डिसेंबर २०२० जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट. ........................................................................मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिने-नाट्य कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांनी सर्व कलाकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक संजय भोसले, वेशभुषा व केशभुषाकार श्रीमती हिना मोमीन, नृत्य दिग्दर्शिका श्रीमती अॅग्नीस हेमिल्टन, दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते गजानन चव्हाण, लेखक-कवी चंद्रकांत साळसकर, लेखक- दिग्दर्शक-अभिनेते सुबोध पवार, ज्येष्ठ निर्माते भास्कर ताकवले, अभिनेता तुषार साळी, अभिनेत्री श्रीमती स्नेहल निंबाळकर, ज्येष्ठ अभिनेते मधुकर सोलकर, निर्माती- दिग्दर्शक श्रीमती पूजा श्रीवास्तव, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते पितांबर काळे, ज्येष्ठ अभिनेते नरेंद्र दांडेकर, ज्येष्ठ अभिनेता- दिग्दर्शक हृद्यनाथ राणे, ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापन. संघ प्रमुख हरी पाटणकर, चित्रकार निलेश मोहिते, अभिनेता विजय कंक, निर्माते- दिग्दर्शक सुधीर पेडणेकर, नृत्य-दिग्दर्शक किरण लोटे, जेम्स कुवेल, जयंत कोपरकर, विनय साळसकर, निसार खान, नासीर कुरेशी अशा अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट-साहित्य-कला-सांस्कृतिक विभागात प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षात स्वागत केले. कला-सांस्कृतिक विभागामार्फत पुढील काही दिवसात सर्व सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. कलाकारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर शासनामार्फत तोडगा काढण्याचे काम आम्ही नक्की करु अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चित्रपट-साहित्य-कला-सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार