दिनांक 3 जाने. 2021. युथ सर्कल हॉल, मुलुंड येथे वंचित बहुजन महिला आघाडी, मुलुंडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचे आयोजन करण्यात आले सावित्रीबाईच्या कार्यावर अनेक वक्‍त्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सावित्रीने तत्कालिन परिस्थीतीत स्त्री शिक्षणाची गरज ओळखून स्त्री शिक्षणाचा पाया घातला. परंतू आज शिक्षित झालेली स्त्री मात्र अंधश्रद्धेच्या गर्तेतच जगत आहे. लिंगसमभाव रुजविण्या्ची आज खरी गरज असून त्याचे संस्कार घरातूनच आजच्या् मातांनी द्यायला पाहिजेत, असे परखड मत अशोक वानखडे यांनी महिला व अंधश्रद्धा या विषयावर बोलतांना व्यक्त केले. महा. अंनिस तर्फे सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजेन्‍द्र कोळी यांनी अंगात देवी येण्याचा प्रसंग रंगतदार करून हशा पिकविला. सदर कार्यक्रमाचे प्रस्तातविक संदेश बालगुडे यांनी केले आणि प्रबोधनाची प्रेरणादायी गीते गावून निर्मला माने यांनी उपस्थितांचा उत्सााह वाढविला. अर्चना मिसळे, मुलुंड तालुका अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, प्रगती जाधव, रजनी कर्ड़क आदी कार्यकर्त्यांच्याअथक प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या सावित्री जयंती कार्यक्रमात वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष सीमा ताई तांबे, मुंबई महासचिव शूभलक्ष्मीताई सावंत, मुंबई उपाध्यक्ष निशीगंधा कदम, आय टी प्रमूख मुंबई स्नेहल सोहनी, ईशान्य जिल्हा अध्यक्ष सुनीता ताई गायकवाड, सचिव स्नेहाताई, सचिव वनिता कांबळे, मुलुंड तालुका अध्यक्ष राहुल भाऊ जाधव, रमेश भाऊ, विपूलभाऊ, दिनेशभाऊ, सचिन चंद्रमोरे तसेच वार्ड अध्यक्ष अनिल भाऊ शिंदे यांच्या सह वंचित बहुजन महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार