जनहित न्यूज महाराष्ट्रच्या दणक्याने एम.जी. एम. हॉस्पिटलला आली जाग


पनवेल वार्ताहर-मयूर भोसले
श्रीमती सुवर्णा सीताराम सकपाळ हा रुग्ण गेली 14 दिवस एम. जी. एम. हॉस्पिटल मध्ये कोरोना च्या नावाखाली महात्मा फुले जीवन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घेत आहें. उपचार घेत असताना रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटल कडून मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत होता.रुग्णाच्या तब्यती विषयी कोणतीही माहिती रुग्णाच्या नातेवाइकाला दिली जात न्हवती. रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मेडिकल स्टोअर मधून औषधे आणण्यास भाग पाडत होत.जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक मयूर भोसले यांनी एम जी एम प्रशासनाला धारेवर धरून महात्मा फुले जीवन आरोग्य योजने चे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. सुधाकर शिंदे यांच्या कडे माहिती देताच एम.जी. एम. हॉस्पिटलला जाग आली व रुग्णाच्या नातेवायकांना बोलाऊन घेऊन त्यांना यां योजने अंतर्गत पूर्ण सेवा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन रुग्णाच्या नातेवाईकांना दिले आहें. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार   आहें. मा. श्री. सुधाकर शिंदे हे पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त असताना त्यांनी केलेले कार्य व आपल्या कार्याने पनवेल मधील जनते वर केलेले प्रेम पनवेल मधील जनता कधीही विसरणार नाही. आज पुन्हा एकदा श्री. सुवर्णा सकपाळ या रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा देऊन पनवेल वरील त्यांच प्रेम असेच कायम राहील हे सिध्द झालं.
जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक मयूर भोसले यांनी जनहित न्यूज तर्फे श्री सुधाकर शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत़.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार