उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन.

उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन...
ठाणे जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आश्वासन...

उल्हास नदी वाचवा, मानव आणि पर्यावरणाचे रक्षण करा. यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्था चे नितीन निकम हे सातत्याने गेली कित्येक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासन आणि संबंधित प्रदुषण नियंत्रण विभागा कडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होऊन जलपर्णी तयार झाली आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे महानगरपालिके कडून कुठली ही प्रकिया न करता मोहना एनआरसी नाला, गाळेगाव नाला व म्हारल नालाचे सांडपाणी सोडणे आहे,
10 फेब्रूवारी 2021 पासुन नितीन निकम यांनी उल्हास नदी वाचवण्यासाठी कैलास शिंदे आणि उमेश बोरगांवकर यांचे सहभाग घेऊन धरणे आंदोलन सुरु केले होते,
उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु असलेले आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन झाले, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जाऊन भेट दिली, सोबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे, कडोंमपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, उल्हासनगर मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधि याना तातडीने  संबंधित विभागाला सूचना देऊन मोहना बंधारा नवीनीकरण, नदी चे खोलिकरण, जलपर्णी काढणे साठी मशीन व्यवस्था, म्हारल नाल्या वर कामा ला प्रत्यक्ष सुरुवात करुन देणार असल्याचे नितीन निकम यांना आश्वासन दिले,
आज सर्व प्रशासकीय अधिकारी, पाटबंधारे, एमपीसीबी, एमआईडीसी, तहसीलदार कार्यालयातिल अधिकारी हे पालकमंत्री यांचे सोबत पाहणी दौरा मध्ये सहभागी होते. अशी माहिती आंदोलनकर्ते यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार