*वीजबिल कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात
*वीजबिल कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात*
पनवेल-मयूर भोसले
पनवेल व नविन पनवेल शहरातील नागरिकांना गेल्या महिना भरापासून धारेवर धरले असुन ज्या नागरिकांनी वीज बिल भरली नव्हती त्यांचे विज कनेक्शन न सांगता कट करुन त्यांना दोन ते तीन दिवस अंधारात राहण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागतं आहें कारण लॉक डाउन मध्ये वाढलेली भरमसाठ बिलांची रक्कम भरणे वीज धारकांना डोईजड झाले आहें त्यामुळे नागरिकांना महा वितरण कार्यालया विरोधात संताप निर्माण झाला आहें.लॉक डाउन मध्ये बर्याच नागरिकांच्या नोकऱ्या जाऊन आर्थिक परिस्थिती डगमळलेली असताना महावितरण अधिकाऱ्यांच्या आरे रावीला सामोरे जावे लागतं आहें त्यामुळे पनवेल मधील वीज कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली असुन शहराध्यक्ष श्री. यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्युत मंडळाचे अधिकारी श्री. नानोटे साहेबांचि भेट घेतली व न सांगता विज कनेक्शन कापले तर महाराष्ट्र नव निर्माण सेना आपल्या स्टाइल ने मैदानात उतरेल असा ईशारा देण्यात आला. श्री नानोटें साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली असुन वीज धारकांना न सांगता विज कनेक्शन कापनार नाही असे आश्वासन त्यांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेला दिले आहें.यावेळी उपस्थित पनवेल तालुक़ा सचिव अमोल पाटिल, नविन पनवेल विद्यार्थी सेनेचे अनिकेत मोहिते, पनवेल विभाग अध्यक्ष गणेश गायकर, महाराष्ट्र सैनिक राम जाधव, सतिश गायकर, सागर पाटील आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..
उप संपादक मयूर भोसले
जनहित न्यूज महाराष्ट्र पनवेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद