रिक्षा-आणि कार चा भीषण अपघात रिक्षातील तिघांचा होरपळून मृत्यू कर्जत कल्याण राज्यमार्गावर कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी सिलेंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, नेरळ पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. 29 मार्च रोजी सकाळी ही दुर्घटना घडली. बदलापूर येथील कुळगाव भागात राहणारे सुभाष जाधव हे रिक्षा (एमएच 05-सीजी 4351) घेऊन पत्नी शुभांगी यांच्यासह सकाळी कर्जतमधील नेरळ पाडा येथे आले. तेथे राहणार्‍या सरिता मोहन साळुंखे यांना सोबत घेऊन ते कर्जतला गेले. सरिता साळुंखे या रिक्षाचालक जाधव यांच्या मेहुणी असून त्या नेरळ येथील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. कर्जत येथील कामे उरकून जाधव हे रिक्षा घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्गाने नेरळकडे येत होते.गारपोली गावाचा जोडरस्ता ओलांडून रिक्षा सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येत असताना कल्याण येथून कर्जत रस्त्याने जात असलेल्या हुंडाई एक्सेंट कारने रिक्षाला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रिक्षाचालक यांच्या सीट खाली असलेला सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यांच्यापैकी एकही व्यक्ती बाहेर पडू शकली नाही. रिक्षाचालक सुभाष जाधव, शुभांगी जाधव (दोघे रा.बदलापूर) यांच्यासह सरिता साळुंखे यांचा होरपळून मृत्यू झाला दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. रिक्षामधील कागदपत्रांवरुन अपघातात जळालेल्या व्यक्तींची ओळख पटली. तर कारमधील तिघे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.कारचालकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी दिलीप वाघ कर्जत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार