*अंबरनाथ रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळणार**"डीआरयुसीसी" कमिटी सदस्य सुभाष साळुंके यांनी घेतली अधिकाऱ्यांसमवेत बैठक**फेरीवाल्यांवर कारवाई करताना नगरपालिकेने देखील सहकार्य करावे
*अंबरनाथ रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळणार*
*"डीआरयुसीसी" कमिटी सदस्य सुभाष साळुंके यांनी घेतली अधिकाऱ्यांसमवेत बैठक*
*फेरीवाल्यांवर कारवाई करताना नगरपालिकेने देखील सहकार्य करावे - रेल्वे प्रशासन*
*अंबरनाथ दि. ०३
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालय व मुतारीची स्वच्छता ठेवणे, पादचारी पुलावर बसणारे फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास व पत्रकार किंवा प्रवाशांमध्ये काही गैरसमज होऊन वादविवाद होण्याचे प्रसंग होऊ नये या दृष्टिकोनातून "डीआरयुसीसी" कमिटीचे सदस्य तथा माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांनी बुधवारी अंबरनाथच्या स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सुभाष साळुंके यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक जॉय अब्राहम, आरपीएफचे अरविंदकुमार, जीआरपीएफचे मुल्ला, चीफ बुकिंग सुप्रिडेंट तायडे, संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
अंबरनाथ रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन असून नोकरी, व्यवसाय व प्राचीन शिवमंदिर पर्यटनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यादृष्टीने प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना अंबरनाथच्या रेल्वे प्रशासनाकडून चांगली सेवा मिळावी, त्याचबरोबर पादचारी पुलावर व आजूबाजूच्या परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर रेल्वेच्या आरपीएफ व जीआरपीएफच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते, त्याला अंबरनाथ नगरपालिकेने देखील सहकार्य करावे अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाच्या वतीने बुधवारी आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आली. असे सुभाष साळुंके यांनी सांगितले.
*खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने "एमयुटीपी-३" अंतर्गत रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर करण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून यात होम प्लॅटफॉर्मची मागणी करण्यात आली होती ते काम पूर्णत्वास येत आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी पादचारी पुलाचे काम चालू असून ते देखील लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देणार असल्याचेही सुभाष साळुंके यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद