अंबरनाथ प्रभाग क्रमांक ४५ मध्ये जागतिक महिला दिन मा.सुभाष साळुंके यांच्या शिवसंवाद जनसंपर्क कार्यालयात झाला साजरा...

 दिनांक ८ मार्च २०२१ रोजी

अंबरनाथ प्रभाग क्रमांक ४५ मध्ये जागतिक महिला दिन     मा.सुभाष साळुंके यांच्या शिवसंवाद जनसंपर्क कार्यालयात झाला साजरा...              राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
शिवसैनिकांची मायमाऊली स्व. मिनाताई ठाकरे
यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ महिला सौ. मांगले काकी, श्रीमती प्राची परांजपे, मा. नगरसेविका सौ.सुप्रिया देसाई,यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संवाद फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी महिलांना गुलाब पुष्प, मोगरा वेणी व Sanitizer बॉटल भेट देऊन स्वागत केले तसेच महिलांनी स्वतःचा मानसिक,शाररिक व आर्थिक विकास केला पाहिजे, मुली व महिलांसाठी मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंके. यांच्या सहकार्याने अनेक व्यावसायिक व रोजगानिर्मिती चे कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा आयोजित केल्याने महिलांना स्वयं रोजगाराची दालने खुली झाली, संसारासाठी आर्थिक मदत झाली,असे सौ. सुवर्णा साळुंके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले व  महीला दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा दिल्या. 
उपस्थित महिला तसेच नगरसेविका सौ. सुप्रिया देसाईमॅडम* यांनी महिलांसाठी सातत्यपूर्ण काम करणारे,मदत करणारे, कार्यक्षम, कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केले, ज्यांची ख्याती आहे ,असे "सुभाष साळुंके"* यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे, असे आवाहन केले.
नगरसेवक– सुभाष साळुंके यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची तसेच अनेक थोर महिलांनी देशासाठी, समाज सुधारणा व अनिष्ट चाली रिती,रूढी–परंपरा यांना बगल व फाटा देऊन  महिला सबळीकरणासाठी केलेले योगदान स्मरणात ठेऊन स्वतःचे सामाजिक, विकासात्मक वाटचाल केली पाहिजे, त्यासाठी महिला सबळ व  सक्षम होणे आवश्यक आहे,तसेच आपल्या आवडी निवडी व कला गुणांना वाव देणे गरजेचे आहे,असे सांगितले.*
 कु. मानसी साळुंके हिने आभार प्रदर्शन केले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.                  ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार