सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ?, मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे - भाई जगताप मुंबई, १० एप्रिल २०२१. कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे. परंतु राज्यांना पाठवण्यात येणाऱ्या लसीमध्ये राजकारण हाेत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे. काेलकात्यामध्ये एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लसीची काेणतीही कमतरता नाही. सर्व राज्यांच्या गरजेनुसार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरीकडे काही राज्यांमधील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे.गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त होती.त्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना आमदार भाई जगताप म्हणाले कि, “भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना व इतर राज्यांना लसींचा पुरवठा करताना भेदभाव केला जातोय…सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ ? मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे.भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना व इतर राज्यांना लसींचा पुरवठा करताना भेदभाव केला जातोय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार