मौजमजेसाठी चोरल्या गाड्या पोलिसांनी घातल्या चोराच्या हातात बेड्या उल्हासनगर , गेल्या अनेक दिवसांपासून मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटर सायकली चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे . दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेत मध्यवर्ती पोलिसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शना नुसार सापळा रचून प्रबुध्द नगर उल्हासनगर कँ. -१ येथून दोघांना अटक केली. यापैकी एक अल्पवयीन (विधीसंघर्षीत ) आहे. त्यांच्या कडून सात मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अटक आरोपीचे नाव प्रशांत सोपान जाधव असे असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या टोळीत विधीसंघर्ष बालकांचा अधिक समावेश असल्याचे मध्यवर्ती पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत