उल्हासनगर मध्ये 15 लाख 64 हजार रुपयाच्या गुटख्या सह तीन आरोपी अटकेत

 विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गुरु संगत दरबार उल्हासनगर कॅम्प नंबर 4 या ठिकाणी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक  करीत अमली पदार्थांचा काळाबाजार सर्रास पणे सुरू होता अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली असता माहितीच्या आधारे पहाटे 4 वाजेच्या सुमारास सहआयुक्त समाधान पवार. सहाय्यक आयुक्त रमेश जाधव. दक्षता व गुप्तवार्ता अन्नसुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे. यांच्या पथकाने पोलीस पथकासह सापळा रचून पहाटे 4 च्या दरम्यान धाड टाकली असता गुटख्याने भरलेला एक ट्रक. एक कार टेम्पो आणि तीन चाकी रिक्षा पकडली व कुख्यात गुटखा माफिया दिलीप वलेच्या आणि निलेश डिंगरा यांच्यासह गाडी चालक दत्तात्रेय एकशिंगे. जयेश हरेशलाल गुलाबानी. आणि सोमनाथ फुलमाळी यांना अटक करण्यात आली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. गुटखा व अमली पदार्थ ट्रक मधून आणून तो रिक्षा टेम्पो अशा छोट्या वाहनांमधून  शहरात  विक्री केला जात होता  गाड्या मधून 15 लाख 64 हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन पथकाने हस्तगत करून विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार