ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर स्थित एकमात्र सिद्धान्त समाज विकास संस्थेची कोविड योद्धा प्रशिक्षणा साठी निवड... प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी देशभरातील प्रशिक्षण केंद्रांचे लाईव्ह उद्‌घाटन केले...उल्हासनगर - देशात येणाऱ्या संभाव्य कोरोना लाटेला टक्कर देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात एक लाखाहून अधिक कोरोना योध्दा प्रशिक्षित करण्यात येत आहेत, या साठी संपुर्ण देशभरातील २६ राज्यात एकूण १११ प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या पैकी महाराष्ट्रात ८ सेंटरची निवड करण्यात आली आहे या पैकी ठाणे जिल्हातील एकमात्र उल्हासनगर स्थित सिद्धांत समाज विकास संस्थेची या प्रशिक्षण केंद्रासाठी निवड करण्यात आली असल्याने या निवडीमुळे उल्हासनगर महापालिकेच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे,गेली ३० वर्षाहून अधिक काळ सुशिक्षित व बेरोजगार युवक युवतींना राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देउन आपल्या सामाजिक कार्याची छाप राज्य शासन दरबारी उठविणाऱ्या सिद्धांत समाज विकास संस्थेत आज पर्यंत अनेक युवतींना नर्सेसचा कोर्स देउन त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविले आहे, संस्थेच्या या अनुभवाची दखल घेत राज्य शासनाच्या शिफारसी नुसार या संस्थेची पैरामेडिकल क्रैश कोर्स साठी निवड करण्यात आली आहे .देशभरात सुरु होणाऱ्या १११ पैरामेडीकल कोर्स सेंटरचे औपचारीक उद्‌घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हा उद्घाटन सोहळा दुरदर्शवर लाईव्ह टेलीकास्ट झाला असून उल्हासनगरच्या सिद्धांत समाज विकास संस्थेचाही सहभाग होता, या सहभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तीशः या संस्थेची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी संस्था सदस्यां बरोबर संवाद साधला,या प्रशिक्षण संस्थेत कोवीड महामारीत नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी सहा प्रकारचे कोर्स डिझाईन करण्यात आले आहेत, या मध्ये होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, एडवांस केअर सपोर्ट, इमरजेंसी केअर सपोर्ट, सँपल केअर सपोर्ट या बरोबरच इक्वीपमेंट सपोर्ट चे पण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सिद्धांत समाज विकास संस्थेचे संस्थापक संचालक सत्यवान माणिक जगताप यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार