आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव



मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळाने थैमान घातले होते
 यावेळी उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब तसेच रस्त्यावरील मोठी झाडे पडली होती
 अनेक रस्त्यावर पाणी साचले व पाणी ओसरल्यानंतर वाहत आलेल्या कचऱ्याचे ढिगारे पडले होते 
अशा परिस्थितीमध्ये उल्हासनगर शहरातील महावितरण विभाग. उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभाग. 
तसेच उल्हासनगर महानगरपालिका सफाई कामगार यांनी तोक्ते चक्रीवादळाच्या संकटात सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन आपले कर्तव्य बजावले
 अशा अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 
लालगड शाखा व समृद्धी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. 
उल्हासनगर महानगरपालिका अग्निशामक दलाचे बाळासाहेब नेटके व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला . 
तसेच महावितरण अधिकारी दिलीप कुमार कुंभरे आणि त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. 
ह्याच सोबत महापालिका विधुत विभागचे हनुमंत खरात यांचा व त्यांचे अधिकारी व कर्मचारी त्यांचाही सत्कार करण्यात आला. 
उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधील मुकादम व सफाई कामगार यांना उत्कृष्ट दर्जाचे मास्क चे वाटप करण्यात आले 
आणि वाढदिवसानिमित्त पाचशे गरजू कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मनसे लाल गड शाखा उल्हासनगर नंबर 4 यांचे वतीने करण्यात आले होते
 अशी माहिती मनसेचे प्रदीप गोडसे यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार