जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल, गॅस, भाजीपाला, डाळी आदी जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्यामुळे प्रचंड महागाई भडकल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन केले . दिनांक २ जून रोजी उल्हासनगर येथील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे, शहराध्यक्ष सोनिया धामी, महिला अध्यक्ष रेखा हिरा, यांच्या नेतृत्वखाली आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने प्रचंड महागाई केली आहे, यामुळे सर्वसामान्य व गरीब नागरिकांचे बजेट कोलमडून पडले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत गंगोत्री यांनी यावेळी केला . प्रतिनिधी कृष्णा महाले जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत