धोकादायक झालेल्या पुलाला बांबुच्या काठयांचा आधार...अंबरनाथ तालुक्यातील चिरड शेलारपाडा गावचा पुल झाला धोकादायक...धोकादायक पूल देत आहे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण...अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या चिरड गावचा पूल सध्या धोकादायक झाला आहे. पुलाच्या कडा या नदीत पडत असून सध्या ग्रामस्थांनी या धोकादायक पुलाला बांबुच्या काठ्यांचा आधार दिलेला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणा कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेला चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नव्या पुलाची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे राजकीय मंडळी देखील दुर्लक्ष करत आहेत. चिरड गावचा पूल हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या पूल थेट मलंगगड भागाला राज्य महामार्गाला जोडत आहे. चिरड गावच्या पुलावरून थेट खोणी तळोजा या मार्गाला जोडला जाणारा पूल सध्या धोकादायक झाल्याने त्याला बांबुच्या काठ्यांचा आधार दिला जात आहे. मात्र या आपुलाला संरक्षक कठडे नसल्याने आणि पुलाचे स्लॅब झाली कोसळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासन कधी अश्या धोकादायकल पुलांकडे लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माजी कामगार मंत्री शाबीर भाई शेख यांच्या कालखंडात या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र आता हा पूल धोकादायक झाला असून अपघातांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार