रंगकर्मी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी चित्रपती फाळके पुतळ्या शेजारी आंदोलन छेडणार. मुंबई दि.५: येत्या सोमवारी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी १० वाजता हिंदमाता सिनेमा समोर भारताचे चित्रपट निर्माते स्व.दादासाहेब फाळके यांच्या दादर येथील अर्धपुतळ्या शेजारी सर्वच कलाकार "जागर रंगकर्मीचा " हा कार्यक्रम सादरकरुन आपल्या मागण्यांमागील आक्रोश आनोख्या पध्दतीने सरकाच्या निदर्शनास आणून देणार आहेत ! देशात कोरोना महामारी सुरू होऊन गेल्या सव्वा वर्षा पासून हातावर पोट घेऊन जगणारा रंगकर्मी देशोधडीला लागला आहे.तर असंख्य कलाकार कामाअभावी मेटाकुटीला आला आहे.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या सहामहिन्यापासून लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर,विजय राणे, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राभर सुरू झालेले आक्रोश आंदोलन आता कलाकारांच्या वर्षोनुवर्षाच्या दशावतारावर स्थिरावले आहे. मेघा घाडगे,विजय राणे,संचित जाधव,सुभाष जाधव ,चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, प्रमोद मोहिते, शीतल माने ,कृष्ण कुमार गावंड,सदानंद राणे आदींनी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सभा घेऊन,निर्मात्यांसह, विविध पारंपरिक रंगकर्मी, चित्रपट, नाट्य, मालिकां मधील कलाकार हिंदी मराठी वाद्यवृंदातील वादक, गायक, निर्माते, शाहीर, तमासगीर,ढोल ताशे, बेंजो पार्टी, ,बुकिंग क्लार्क, व्यवस्था पक,नाट्य वितरक,रंगमंच कामगार,तंत्रज्ञानी यासर्वांना एकत्र आणून मोठे संघटन उभे केले आहे. आज ५ अगस्ट रोजी दुपारी ३ वाजता नायगाव येथील अंकूर बुद्धविहार येथे विविध कला क्षेत्रातील संघटकांची सभा होऊन,अभिनेते विजय पाटकर म्हणाले,कलाकारांच्या मागण्या़वर महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रथमच एकाचवेळी आंदोलन ९ ऑगस्ट रोजी छेडले जाणार आहे.हा ऐतिहासिक योगायोग असून हे आंदोलन राजकारण आणि संस्था विरहित आहे.कोणी अध्यक्ष नाही. कोणी सेक्रेटरी नाही. कलाकारांनी कलाकारांसाठी सुरु केलेले हे आंदोल न आहे. विजय पाटकर पुढे म्हणाले,कोरोना किती काळ रहाणार हे माहीत नाही,पण या पुढे आईच्या किवा स्वतःच्या आजरात लाख दीड लाख रुपये लागले तर दुसऱ्यावर अवलंबून रहाता येऊ नये यासाठी आता स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी संघटन मजबूत करावी लागणार आहे .या द्वारे कलाकारांना मी कोण आहे,याची ओळख करुन देण्याची वेळ आली आहे,असेही विजय पाटकर आपल्या भाषणात म्हणाले. संचित जाधव यांनी सांगितले, आंदोलन कलाकारांच्या आजवरच्या उज्वल किर्तीला शोभेल असे शांततेने पार पडेल.सर्व स्तरातील कलाकारांच्या एकूण १४ मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत.सात मागण्या लॉकडाऊन मधील भिषण समस्येवर वर आहेत तर सात मागण्या कलाकारांच्या आयुष्यभराच्या व्यथेवर आहेत. विजय राणे यांनी सांगितले की,सात मागण्यांमध्ये माथाडी कामगारांच्या धरतीवर रंगकर्मी बोर्ड, रंगकर्मी हमी योजनाची मागणी करण्यात आली आहे.या प्रसंगी अनेक संस्था प्रमुखांनी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. अभिनेत्री मेघना घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सरकारने सहानुभूतीपूर्वक या आंदोनाचा विचार नाही केला तर अमरण उपोषण छेडण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे अशी माहिती बुकिंग व्यवस्थापक हरि पाटणकर यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार