राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांच्या भाजपात प्रवेश. .राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्हासनगर महासचिव असलेल्या अमित वाधवा भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी मनीश हिंगोराणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उल्हासनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळेस भाषण करताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाचे तसेच गोरगरीब नागरिकांसाठी सुरु केलेल्या योजनेची माहिती दिली तसेच बेळगाव महानगरपालिकेत आलेल्या भाजपच्या बहुमतासंबधी सांगताना चव्हाण यांनी सांगितले की, देशात सर्वाधिक खासदार भाजपाचे आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आमदार नगरसेवक महापौर जिल्हा परिषद सदस्य हे सर्वाधिक असल्याचे सांगितले तसेच येत्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा एक हाती सत्ता मिळणार असल्याचे समर्थ वाटचाल करीत असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत