उल्हासनगर महानगरपालिका येथील वाहन विभाग मधील व्यवस्थापक व त्याचा साथीदार कंत्राटी वाहन चालक यास लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी घेतले ताब्यात लोकसेवक यशवंत रतन सगळे व्यवस्थापक वाहन विभाग उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर जिल्हा ठाणे.भारत सोपानराव येटाळे कंत्राटी ड्रायव्हर उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर यातील तक्रारदार यांना व त्याचप्रमाणे इतर काही वाहन चालक व हेल्पर यांना पगार वेळेवर काढून देण्याकरिता व इतर सुविधा देण्याकरिता. एका कंत्राटी ड्रायव्हर याच्या मार्फतीने दरमहा कंत्राटी ड्रायव्हर व हेल्परयांचेकडून ३००० रुपये घेत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १३ डिसेंबर २०२१ रोजी पडताळणी केली असता नमूद लोक सेवक यांनी कंत्राटी ड्रायव्हर यांच्यामार्फतीने तक्रारदार यांचेकडे त्यांना पगार वेळेवर काढून देण्याकरिता ३००० रुपये लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने ए सी पी ठाणे युनिटने सापळयाचे आयोजन करून कंत्राटी ड्रायव्हर यांना तक्रारदार यांचेकडून ३००० रुपयांची लाच स्वीकारताना उल्हासनगर महानगरपालिका तरण तलावाच्या समोरील रस्त्यावर रंगेहाथ पकडण्यात आले असून. लोकसेवक यांना उल्हासनगर महानगरपालिकेतील वाहन विभाग कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार