उल्हासनगर : घरकाम करण्याच्या बहाण्याने घरात घुसून ९१ तोळे सोने चोरी करणाऱ्या महिलेला उल्हासनगर पोलीस आणि क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या महिलेकडून २५ तोळे सोने हस्तगत केले आहे. पोलीस तपासात तिच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये तिने अशाच प्रकारे चोऱ्या केल्या आहेत. तिच्यावर १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. एका घरातून तिने तब्बल ९१ तोळे सोने चोरले होते. घरकाम करण्याच्या बहाण्याने ती घरात गेली. कुटुंब घराबाहेर गेले असताना, तिने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडून सोने चोरी केले होते. त्यानंतर ती पसार झाली होतीमिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये घरकाम करण्याचा बहाणा करून एका घरातून ९१ तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला गजाआड केले आहे. राम तनवाणी यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने ही चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला सापळा रचून अटक केली. आरोपी महिला पोलिसांना चकवा देत होती. धक्कादायक म्हणजे, या महिलेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळाली आहे. उल्हासनगर क्राइम ब्रांचने महिला आरोपीकडून २५ तोळे सोने हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगळे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका