कल्याण डोंबिवली मध्ये शनिवारी २५ डिसेंबर रोजी नाताळ आणि ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी आराखडा तयार केला ३१ डिसेंबरला कल्याण परिमंडळ ३ मधील जवळ जवळ पावणे दोनशे अधिकारी आणि साडेनऊशे कर्मचारी हे सर्व रस्त्यांवर जागोजागी गस्त घालणार आहेत. शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी लावली जाईल. नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ अॅनालायझर ठेवले जातील आणि ड्रंक अँड ड्राइव्हचे गुन्हे ही दाखल केले जातील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण-डोंबिवलीतील पोलीसही सज्ज झाले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कल्याण परिमंडळ ३ मधील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकारी व महिला पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून सर्व ठिकाणी तपासणी केली जाईल. तसेच प्रामुख्याने शांतता समिती व हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क साधून बैठका घेण्यात आल्या आहेत. करोना नियमांचे पालन करून ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताचा जल्लोष शांततेच्या मार्गाने कसा साजरा करता येईल, याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले हॉटेल, रिसॉर्टवर राहणार लक्ष, हॉटेल रिसॉर्ट मध्ये पार्टीचे आयोजन केले असल्यास त्या ठिकाणी केडीएमसी अधिकारी यांच्या सोबत एक पथक तयार करून करोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी केली जाईल. त्याच प्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत केडीएमसी ने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस स्टेशनचे व्हिडिओ कॅमेरे आणि काही ठिकाणी आवश्यकते प्रमाणे ड्रोनचा वापर करून चालणाऱ्या पार्ट्या आणि सेलिब्रेशन यावर लक्ष ठेवले जाईल,. असे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार