उल्हासनगर महानगरपालिका चे जबाबदार अधिकारी अखेर गेले कुठे ? उल्हासनगर महानगरपालिका च्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या नेहमी रिकाम्या का ?असतात. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त रजेवर आहेत. तर उपआयुक्त हजर नाहीत ?. तसेच लेखा अधिकारी व आरोग्य अधिकारी सुद्धा हजर नाहीत ?. उल्हासनगर महानगरपालिका मनसे युनियन संघटना चे दिलीप थोरात यांनी उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या. वाढ पगार. तसेच सातवा वेतन चा थकित वेतन तसेच कर्मचारी यांच्या अनेक मागण्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात मनसे युनियनचे दिलीप थोरात आणि त्यांचे सहकारी कार्यालयात गेले असता कार्यालयात एक ही जबाबदार अधिकारी हजर नसल्याची माहिती पत्रकारांना देऊन जबाबदार अधिकारी यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली . उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत उल्हासनगर महानगर पालिकेचे कर्मचारी यांना नवीन वर्षात वाढ पगार मिळेल असी आशा होती परंतु कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्या मुळे कर्मचाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल तसेच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि पगारात सुद्धा लावण्यात आला परंतु सातवा वेतनाची थकित रक्कम तीन टप्प्याने देण्याचे आदेश असताना सुद्धा एका ही टप्प्याची थकित रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागचे नेमके कारण म्हणजे उल्हासनगर महानगरपालिका ला जबाबदार अधिकारीच नाहीत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार