*जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स*राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ.शंकरजी पोवार यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शंकर पोवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जागर व्यसनमुक्तीचे या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हास्तरीय पातळीवर बदलापुर शहर येथे करण्यात आले होते.जीवन आधार फाउंडेशनच्या बॅनर खाली जागर व्यसनमुक्तीचा पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी रवी कोळीठाणे जिल्हा कार्याध्यक्ष व कु.सुरेश पाटीलबदलापुर शहर युवक अध्यक्ष यानी मार्गदर्शक अनिल चाळके याच्या मार्गदर्शना खाली केली.बदलापुर नगरपरिषद प्रवेशद्वारा बाहेर पत्रक वाटप करण्यात आले व बदलापूर पूर्व तिकीट घराबाहेर तसेच रेल्वे ब्रीजवरील येणाऱ्या जाणार्‍या प्रवाशांना व्यसनमुक्ती साठी शालेय विद्यार्थांमार्फत पत्रक वाटप करण्यात आले. व्यसनमुक्तीचे एक छान सामाजिक संदेश आपल्या बदलापुर मधिल जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न जीवन आधार फाउंडेशन मार्फत करण्यात आला.अंजली मॅडमच्या अचिव्हर्स अकॅडमी (सतत जीवन आधार फौंडेशन च्या उपक्रमात सामील होतात )म्हणजेच शालेय विद्यार्थांचे खुप मोठे सहकार्य दरवेळे प्रमाणे लागले.कार्यक्रमाच्या शेवटी व्यसनमुक्तीवर एक शपथ ही ग्रहण करण्यात आली कार्यक्रमास अनेक पदाधिकारी उपस्थित होते.चाळके साहेबांच्या मार्गदर्शना मुळेच जागर व्यसनमुक्तीचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या वेळीसौ.प्रतिभाताई शंकर पोवार.सौ.निरजाताई रूपेश आंबेरकर.रोहितकुमार प्रजापती.सौ.अंजलीताई नारकर.अनिल चाळके.रवी कोळीकु.सुरेश भिकन पाटील .सौ.श्रद्धा मेस्त्री .रूपेश आंबेरकर.भुषण राऊत समस्त अचिव्हर्स अकॅडमी {बच्चेपार्टी} तसेच पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित सर्व सदस्य पदाधिकारी व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार