26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
२६ जानेवारी
७३ वा प्रजासत्ताक दिन वडवली विभागात उत्साहात झाला साजरा
अजादी का अमृत महोत्सव वर्ष निमित्त मा. नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले
यावेळी सीमेवर लढून देशरक्षण करणाऱ्या सैन्य दलातील ११ निवृत्त सैनिकांचा प्राथमिक स्वरूपात कुटुंबासह सन्मान सोहळा आयोजित केला
देशाला परकीय आक्रमणापासून ऊन– पाऊस–हवा–बर्फ अश्या प्रतिकूल तमा न बाळगता केलेल्या अहोरात्र सेवेमुळे भारतीय नागरिक सुखाची झोप घेत असून सैनिकांच्या सेवेमुळेच देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे
प्रजासत्ताक दिना निमित्त सैनिक प्रमाण पत्र देऊन सन्मान करताना आम्हांस आनंद होत आहे,असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक सुभाष साळुंके यांनी केले
सहपत्नीक आम्हां सैनिकांचा अंबरनाथ प्रथमच असा सत्कार सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांनी केला, त्याबद्दल त्यांचे ऋणी आहोत तसेच सुभाष साळुंके व सुवर्णा साळुंके हे नेहमी आगळेवेगळे लोकोपयोगी उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबवित असतात.त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. असे कॅप्टन अनंत जगताप व माजी सैनिक .रणजित सुर्यवंशी यांनी सत्करा प्रसंगी मत व्यक्त केले
आभार प्रदर्शन कु.मानसी साळुंके यांनी केले.
याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी विजय करावडे, कु.पौर्णिमा शिंदे, कु.ओवी आचरेकर, कु.ओवी अक्षय पाध्ये यांनी भक्तीपर गाणी सादर केली तसेच कु.सुमित बनसोडे यांनी लहान मुलांसह कवायत सादर केली.
प्रशिक गायकवाड.
दिनकर नारखेडे, सुनिल देशपांडे, सार्थक साळुंके, विलास शेट्ये, गोविंद शेडगे, सौ.सुनंदा मांढरे, सौ. सुषमा आचरेकर, सौ. सुनिता रघुनाथन,सौ.जयश्री वाघेला, सौ. पाध्ये यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद